मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अनुष्का-विराटच्या 10 महिन्याच्या लेकीला मिळालेल्या रेपच्या धमकीवर संतापला अभिनव शुक्ला; ट्विट करत म्हटलं....

अनुष्का-विराटच्या 10 महिन्याच्या लेकीला मिळालेल्या रेपच्या धमकीवर संतापला अभिनव शुक्ला; ट्विट करत म्हटलं....

 'बिग बॉस 14'  (Bigg Boss 14)  आणि 'खतरों के खिलाडी 11' फेम अभिनव शुक्लाने  (Abhinav Shukla)  अनुष्का शर्मा  (Anushka Shrama)  आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या  (Virat Kohali)  मुलीला बलात्काराच्या धमक्या देणाऱ्या यूजर्सचा निषेध केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई,3 नोव्हेंबर- 'बिग बॉस 14'  (Bigg Boss 14)  आणि 'खतरों के खिलाडी 11' फेम अभिनव शुक्लाने  (Abhinav Shukla)  अनुष्का शर्मा  (Anushka Shrama)  आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या  (Virat Kohali)  मुलीला बलात्काराच्या धमक्या देणाऱ्या यूजर्सचा निषेध केला आहे. अशा लोकांना त्यांनी ट्विटद्वारे कडक संदेश दिला आहे. टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तानकडून पराभव झाला तेव्हा विराटला ही धमकी ट्विटरवरून देण्यात आली होती. विराटने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची बाजू घेतली होती. त्यानंतर असा धक्कादायक प्रकार घडला होता.

काय म्हणाला अभिनव शुक्ला-

अभिनव शुक्लाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं की, "10 महिन्यांच्या मुलीला काही लोकांकडून धमकावण्यात आलं आहे. ही आपण गाठलेली नवीन नीचतेची पातळी आहे!” अभिनवच्या या ट्विटवर अनेक यूजर्सनी सहमती दर्शवली आहे. एका यूजरने सांगितले की, "अशा मानसिकतेचे लोक अजूनही आपल्या समाजात आहेत. कधीकधी मला वाटते की सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना ट्रॅक करण्यासाठी आणि त्यांच्या विषारी बोलण्याबद्दल त्यांना अटक करण्यासाठी आपल्या देशात एक योग्य व्यवस्था असायला हवी."

आणखी एका यूजरने लिहिलं की, "सरकारने प्रत्येक नागरिकाची दर सहा महिन्यांनी मानसिक तपासणी करावी. त्यांनी याबाबत एक टीम तयार करावी. या प्रकारच्या धमक्यांना काही नियम लागू करा, फक्त मानसतज्ञ् हे देऊ शकतात. आता खरंच घाबरलोय."

आणखी एका यूजरने लिहिलं की, "मला वाटते की तुम्ही कोहलीच्या मुलीला (विराट कोहलीची मुलगी वामीका) धमक्यांवर बोलत आहात. होय हे लाजिरवाणे आहे. आपण रोज नवा नीचांक पाहत आहोत. आधी आयपीएलमध्ये चांगले न खेळल्याबद्दल धोनीच्या मुलीवर आणि आता टी-२० वर्ल्ड कपमध्ये चांगले न खेळल्याबद्दल.दिल्ली महिला आयोगाने मंगळवारी (२ नोव्हेंबर) दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आणि सांगितले की, मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या मुलीला दिलेल्या धमक्यांची आयोगाने स्वत:हून दखल घेतली आहे.

(हे वाचा:Bigg Boss 15: ट्विटरवर ट्रेंड होतोय #EvictSimbanow ट्रेंड; उमरला टेररिस्ट म्हट..)

सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात संघाचा पराभव झाल्यापासून विराट कोहलीच्या नऊ महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या ऑनलाइन धमक्या दिल्या जात असल्याचेही या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

First published:

Tags: Anushka sharma, Tv actor, Virat kohali