मुंबई, 30 जानेवारी- प्रसिद्ध व्हिडिओ जॉकी (VJ), टीव्ही होस्ट (Host) आणि बिग बॉस 15 (Bigg Boss 15) चा स्पर्धक करण कुंद्राची (Karan Kundra) एक्स गर्लफ्रेंड (Ex Girlfriend) अनुषा दांडेकरनं (Anusha Dandekar) पुन्हा एकदा सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे.अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर आपला बिकिनी व्हिडिओ शेअर केला.व्हिडिओमध्ये अनुषा दांडेकर बिकिनी घालून पूलमध्ये उतरताना दिसत आहे.या हॉट व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनुषाचा हा व्हिडिओ थ्रोबॅक व्हिडिओ असल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये ती दुबईतील स्विमिंग पूलमध्ये उतरताना दिसत आहे. अनुषाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, अमेरिकन गर्ल ग्रुप डेस्टिनीज चाइल्डचं बुटिलिशियस गाणं बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना 40 वर्षीय अनुषा दांडेकरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय– “मला वाटतं तुम्ही तयार आहात… #filterfreeculture सर्व प्रकारे!”. या हॉट अँड बोल्ड बिकिनीमध्ये अनुषाला पाहिल्यानंतर आता यूजर्स स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीत. अनेक यूजर्स तिच्या बोल्ड लूकचे कौतुक करत आहेत तर अनेक जण तिच्यावर निशाणा साधत आहेत. या व्हिडिओमध्ये अनुषा दांडेकरचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. अनुषा अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. मग ते व्हेकेशन सेलिब्रेशन असो किंवा तिच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत पार्टी करत असो, अनुषा तिच्या आयुष्यातील पप्रत्येक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल १. ५ मिलियन फॉलोअर्स आहेत.
नुकतंच अनुषाने तिचा 40 वा वाढदिवस आपले कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत एका सुंदर ठिकाणी साजरा केला. मॉडेलने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी अनुषासोबत तिची बहीण शिबानी दांडेकर आणि जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीसुद्धा होती. (हे वाचा: हातात-हात घालून फिरणारी Hrithik Roshan ची Mystery Girl आहे ‘ही’ अभिनेत्री! ) अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी Mtv शो ‘लव्ह स्कुल’ सुद्धा होस्ट केला होता. टीव्हीवरील फेमस कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु अचानक गेल्यावर्षी त्यांचा ब्रेकअप झाला. यावेळी अनुषाने करणवर आपल्याला फसवल्याचा आरोप केला होता. परंतु करणने आपण एकमताने हा निर्णय घेतलं असल्याचं सांगितलं होतं.