जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Aryan Khan: पठाण रिलीजआधीच शाहरुखच्या लेकाला मोठा दिलासा, समोर आली महत्त्वाची माहिती

Aryan Khan: पठाण रिलीजआधीच शाहरुखच्या लेकाला मोठा दिलासा, समोर आली महत्त्वाची माहिती

आर्यन खान

आर्यन खान

बॉलिवूडच्या किंग खानचा मुलगा आर्यन खानचं नाव ड्रग्ज प्रकरणात आल्यापासून तो सतत चर्चेत असतो. मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यनचं नाव समोर आलं होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर : बॉलिवूड च्या किंग खानचा मुलगा आर्यन खानचं नाव ड्रग्ज प्रकरणात आल्यापासून तो सतत चर्चेत असतो. मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यनचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणी आर्यन खानला अटकदेखील करण्यात आली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभर खळबळ उडालेली पहायला मिळाली. अशातच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असल्याचं समोर आलं आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यनला क्लिट चीट मिळाली आहे. एनसीबीने आर्यन खानला केवळ क्लीन चिटच दिली नाही तर आर्यन खानला अटक करणाऱ्या टीमशी संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचेही आदेश दिले आणि त्यांच्या कृतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. आर्यनला क्लीन चीट मिळाल्यानंतर क्लीन चीट विरोधात देखील याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आता कोर्टाच्या आदेशानंतर ही याचिका मागे घेण्यात आली आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आता ड्रग्ज प्रकरणी आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे.

जाहिरात

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आर्यन खानचं नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आलं होते. याप्रकरणी आर्यन खानसह अनेकांना एनसीबीने चौकशीनंतर अटक केली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले. यानंतर त्याला एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 सी, 208, 27 आणि 35 अंतर्गत अटक करण्यात आली. हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला जामीन मिळाला. मात्र, नंतर आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा न सापडल्याने त्याला क्लीन चिट देण्यात आली.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, आर्यन खान लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. आर्यन लेखक-दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय त्याने स्वतःची एक कंपनी देखील सुरु केली असून व्यवसाय क्षेत्रातही तो सक्रिय असणार आहे. आर्यनला दिग्दर्शन करताना पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उस्तुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात