मुंबई, 02 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी बातमी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. सुशांत 2013 पासून मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याच्या नैराश्याबाबत सुशांतच्या कुटुंबीयांना देखील माहित होते. मुंबई पोलिसांना सुशांतच्या कुटुंबीयानी ही माहिती दिली होती. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. सुशांतची मोठी बहीण मितू सिंह (Mitu Singh) यांचे असे म्हणणे आहे की, ’ सुशांतने सर्वप्रथम आपल्या संपूर्ण कुटूंबाला ऑक्टोबर 2019 मध्ये त्याला नैराश्य असल्याचे वाटत असल्याचे सल्याचे सांगितले. त्यावेळी नीतू आणि प्रियांका मुंबईकडे विमानाने रवाना झाल्या. त्या काही काळ सुशांतबरोबर होत्या. 2019 मध्ये त्याला नैराश्यात असल्याचे जाणवू लागल्यामुळे त्याने डॉ. के चावला यांच्याकडून औषध घ्यायला सुरुवात केली.’ मुंबई पोलिसांसमोर सुशांतच्या बहिणींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याची एक कॉपी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील देण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या जबाबातून असे स्पष्ट होते आहे की, 2013 पासून सुशांतच्या कुटुंबीयांना त्यांच्या मानसिक आजाराबाबत माहित होते. (हे वाचा- SSR Death Case : अंमली पदार्थ तस्करीची पाळंमुळं गोव्यात, NCB ने केली तिसरी अटक ) मितू सिंह यांच्या स्टेटमेंटनुसार लॉकडाउन दरम्यान तो घरी होता. यावेळी तो व्यायाम आणि पुस्तके वाचत असे. 08 जून रोजी सुशांतने त्याची बहिण मितूला भेटण्यास बोलावले. संध्याकाळी मितूने विचारले त्याची चौकशी केली असता त्याने ठीक वाटत नसल्याचे सांगितले, तसंच लॉकडाऊनमध्ये तो कुठेही जाऊ शकला नव्हता. त्यावेळी मितू सुशांतबरोबरच राहिली होती, त्यांनी त्याचे दक्षिण भारतात जाण्याच्या प्लॅनबाबत देखील चर्चाा केली. मितू त्याच्या आवडीचे पदार्थ वस्तू बनवत असे. मात्र 12 जून रोजी मितू तिच्या गोरेगाव येथील घरी परतली कारण तिची मुलगी घरी एकटीच होती. तिने त्यानंतर सुशांतला निरोप पाठवला पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. ‘त्या’दिवशी मितूने केला होता सुशांतला फोन पण… सुशांतच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार 14 जून रोजी 10.30 वाजता सुशांतला फोन केला पण त्याने फोन उचलला नाही. त्यावेळी मितून सिद्धार्थ पिठानीला फोन केल्याची माहिती मिळते आहे. यावेळी पिठानीने तिला सांगितले की सुशांतला नारळाचे पाणी आणि डाळिंबाचा रस दिला आहे, तो झोपला असावा. मितूने सिद्धार्थला सुशांतला पाहण्यास सांगितले तेव्हा त्याचा दरवाजा आतून बंद होता. तेव्हा मितू असे म्हणाली की तो कधीच दार बंद करत नाही, त्यामुळे तिने दार उघडण्यास सांगितले आणि ती त्याच्या घराकडे येण्यास निघाली. (हे वाचा- कंगनाने करण जोहरबाबत व्यक्त केली भीती, पंतप्रधानांकडे मागितली मदत ) थोडावेळात मितूला पुन्हा एकदा पिठानीचा फोन आला. त्याने सांगितले की त्याने दरवाजा उघडला आहे आणि त्याला सुशांत हिरव्या कुर्त्यामध्ये पंख्यावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यांनी त्याला पलंगावर खाली उतरवले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.