Elec-widget

पहिल्याच आठवड्यात Bigg Boss 13 बंद करण्याची मागणी, समोर आलं धक्कादायक कारण

पहिल्याच आठवड्यात Bigg Boss 13 बंद करण्याची मागणी, समोर आलं धक्कादायक कारण

सोशल मीडियावर काही हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. ज्यांच्या माध्यमातून बिग बॉस 13 ला जोरदार विरोध केला जात आहे

  • Share this:

मुंबई, 06 ऑक्टोबर : रिअलिटी शो 'बिग बॉस' हा टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो मानला जातो. या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही गोंधळ हमखास पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच या शोच्या 13 व्या सीझनला सुरुवात झाली. मात्र यावेळी हा सीझन सुरू होऊन जेमतेम एखाद  आठवडा होतो न होतो तोपर्यंतच हा शो बंद करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. सोशल मीडियावर काही हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. ज्यांच्या माध्यमातून बिग बॉस 13 ला जोरदार विरोध केला जात आहे आणि यामागचं धक्कादायक कारण सुद्धा आता समोर आलं आहे.

ट्विटरवर शुक्रवारच्या रात्रीपासून #UnsubscribeColoursTV, #Boycott_BigBoss, #JehadFelataBigBoss सारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. एवढंच नाही तर अनेकजण सलमान खानला ब्लॉक करुन त्याचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर करतना दिसत आहेत. हे सर्व होण्यामागचं मुख्य कारण आहे बिग बॉस 13 ची थीम आणि नव्या घराचा सेटअप.

जावेद अख्तरांसोबत 55 वर्षांपूर्वी काय घडलं होतं? शबाना आझमींनी शेअर केली पोस्ट

हे आहे विरोधाचं कारण

या सीझनच्या सुरुवातीलाच घरात एंट्री करणाऱ्या स्पर्धकांना सलमान खाननं त्यांचा BFF कोण असणार आहे हे सांगितलं होतं. या BFF च्या संकल्पनेनुसार यावेळी एका वेळी एका बेडवर 2 व्यक्ती झोपणार आहेत. तर बिग बॉस 13 च्या सुरुवातीपासूनच मुलं आणि मुली एक बेड शेअर करत आहेत आणि प्रेक्षक बिग बॉसच्या या फॉरमॅटचा विरोध करत आहेत.

Loading...

भाजपा नेत्यानं केला विरोध

बिग बॉस 13 बाबत भाजपा नेता सत्यदेव पचौरी यांनी नाराजीपूर्ण ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं, हे बिग बॉस नाही तर अय्याशी करणाऱ्यांचा हा अड्डा आहे. या शोला आमचा पूर्ण विरोध असून हा शो लवकरात लवकर बंद करावा. खरंतर मी यांचा अद्याप एकही एपिसोड पाहिलेला नाही. मात्र याबद्दल सगळीकडे बरंच काही बोललं जात आहे त्यातून माहिती मिळते. हे असे शो समाजात चुकीचा संदेश पोहोचवण्याचे काम करत आहे. त्यामुळे ते लगेचच बंद करण्यात यावेत. #UnsubscribeColoursTV

अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनं ठेवलं होतं बाथरुमध्ये कोंडून, Bigg Bossमध्ये केला खुलासा

लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा शो

एका युजरनं लिहिलं, 'सलमान खानजी  सिनेमामध्ये देशभक्ताची भूमिका साकारणारा एवढा खालच्या पातळीला गेला आहे. पैशांसाठी सर्व काही चुकीच होत असलेलं दिसूनही डोळे बंद केले आहेत की, पैशाच्या लालचानं मुलींकडून अशाप्रकारच्या गोष्टी करुन घेऊन लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहात का? तुम्ही कोणाला बहिण मानता का?'

हे सर्व अशाप्रकारचे ट्वीट पाहिल्यावर  खरंच असं वाटतं कि, बिग बॉसच्या मेकर्ससाठी येत्या काळात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे या विरोधानंतर घरातील फॉरमॅट बदलला जातो की, तसाच राहतो याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

सुनील शेट्टीची लेक करतेय केएल राहुलला डेट? सोशल मीडियावर PHOTO VIRAL

=========================================================

VIDEO : अंग गोठवणाऱ्या थंडीत वर्षभर राहणाऱ्या नवदुर्गेचा अनुभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 12:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...