Home /News /entertainment /

‘तो मी नव्हेच….’; एजाज खानमुळं या अभिनेत्यावर होतोय ड्रग्ज घेतल्याचा आरोप

‘तो मी नव्हेच….’; एजाज खानमुळं या अभिनेत्यावर होतोय ड्रग्ज घेतल्याचा आरोप

सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर जोरदार टीका देखील होत आहे. अखेर तो मी नव्हेच कृपया माझ्यावर टीका करु नका अशी विनंती करण्याची वेळ एजाजवर आली आहे.

    मुंबई 3 एप्रिल: कलाकारांची नावं एकसारखी असल्यास अनेकदा प्रेक्षकांचा गोंधळ होतो. एखाद्या कलाकारानं केलेल्या चुकीचं खापर दुसऱ्यावर फोडलं जातं. असाच काहीसा प्रकार एजाज खानच्या बाबतीत घडला आहे. अलिकडेच NCBनं प्रसिद्ध टीव्ही अभिनेता एजाज खानला (Ajaz Khan) ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलं. (Bollywood drugs case) मात्र या कारवाईचा परिणाम दुसऱ्या एजाजच्या (Eijaz Khan) आयुष्यावर झाला आहे. त्याच्याकडे प्रेक्षक संशयाच्या नजरेनं पाहात आहेत. सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर जोरदार टीका देखील होत आहे. अखेर तो मी नव्हेच कृपया माझ्यावर टीका करु नका अशी विनंती करण्याची वेळ एजाजवर आली आहे. “तो एजाज खान मी नाही. तुमचा काही तरी गोंधळ होतोय. मला ड्रग्ज प्रकरणात अटक झालेली नाही. कृपया गैरसमज दूर करा. हे पाहा मी आता नवा चष्मा देखील घातला आहे. अजूनही तुम्ही मला ओळखू शकत नसाल तर तुमचा चष्मा बदलण्याची वेळ आली आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन एजाजनं तो मी नव्हेच असं टीकाकारांना सांगितलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवश्य पाहा - सारा अली खाननं निया शर्माला केलं कॉपी? तुम्हीच ठरवा कोण दिसतंय अधिक सुंदर हा एजाज देखील NCBनं ताब्यात घेतलेल्या एजाजप्रमाणेच टीव्ही अभिनेता आहे. लक्षवेधी बाब म्हणजे दोघंही बिग बॉसमध्ये झळकले होते. त्यामुळं अनेक ठिकाणी बिग बॉसमधील अभिनेत्याला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. अर्थात ही बातमी खरी आहे. पण यामुळं अनेकांचा नावात गोंधळ झाला अन् त्यांनी दुसऱ्या एजाजवर टीकेची झोड उठवली. पण ही टीका थांबवण्यासाठी आता त्यानं स्वत:च पुढाकार घेतला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actress, Drugs, NCB

    पुढील बातम्या