जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Urvashi Rautela: मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली उर्वशी रौतेला; अभिनेत्रीसमोरच त्या मुलीसोबत घडलं भयंकर

Urvashi Rautela: मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली उर्वशी रौतेला; अभिनेत्रीसमोरच त्या मुलीसोबत घडलं भयंकर

 उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला

सध्या अभिनेत्री एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे ज्यामध्ये ती एका अकादमीच्या उद्घाटनाला पोहचली होती तेव्हाच एक अपघात झाला. काय घडलं नक्की जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 एप्रिल :बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला चांगलीच लोकप्रिय आहे. उर्वशी तिच्या चित्रपटांपेक्षा व्यक्तिगत आयुष्यामुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. उर्वशीने आजवर बोटावर मोजण्याइतकेच सिनेमे केले आहेत. तरी अभिनेत्रीची लोकप्रियता प्रचंड आहे. तिने ‘सिंह साब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमधील तिच्या प्रवासाला सुरुवात केली पण हिंदीशिवाय ती तामिळ-तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही दिसली आहे. चिरंजीवीच्या वॉल्टेअर वीरैयाच्या बॉस पार्टी गाण्यात दिसल्यापासून ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून साऊथ सिनेसृष्टीतही चर्चेत आहे. खुद्द चिरंजीवीही तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे चाहते झाले होते. सध्या अभिनेत्री एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे ज्यामध्ये ती एका अकादमीच्या उद्घाटनाला पोहचली होती  तेव्हाच एक अपघात झाला. काय घडलं नक्की जाणून घ्या. नुकतीच उर्वशी फॅशन आणि ग्लॅमर अकादमीच्या लाँचिंगसाठी पिंक सिटी जयपूरला पोहोचली. यादरम्यान, तिने ऑफ-शोल्डर ब्लाउजसह जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती, ज्यामध्ये ती आपल्या ग्लॅमरस लुकने सर्वांना प्रभावित करताना दिसत होती. हाय पोनी हेअरस्टाईलमध्ये अभिनेत्रीची स्टाईल दिसत होती. तिला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते येथे पोहोचले होते आणि प्रत्येकजण अभिनेत्रीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. उर्वशीने आनंदाने सर्वांसमवेत सर्वांसाठी पोझ दिली. मात्र उर्वशी रौतेला चाहत्यांसोबत सेल्फी काढत असताना कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका मुलीसोबत होणारा अपघात टळला. यावेळी उपस्थित सर्व लोक काही काळ घाबरले. टेम्पोतून प्रवास करत होते मिथुन चक्रवर्ती; समोरून आलिशान गाडीतुन येणाऱ्या अमिताभ यांनी दिली अशी वागणूक उर्वशी रौतेला भीषण अपघात होण्यापासून थोडक्यात बचावली आहे. त्या अपघाताचा भयानक व्हिडिओ उर्वशी रौतेलाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका कार्यक्रमात केक कापायला पुढे येते, तेव्हाच एक मुलगी तिथे जळणारी मेणबत्ती ठेवते आणि अचानक मोठी आग लागते. दरम्यान, त्या मुलीचे केस आगीत जळून जातात आणि तेव्हाच उर्वशी घाबरते. मात्र, काही वेळातच लोकांनी तिच्या केसातील आग विझवली आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले असून, उर्वशी सोबत हा अनर्थ घडू शकला असता पण वेळीच तो टळला.

News18

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघातानंतर उर्वशीने मुलीला तत्काळ डॉक्टरांकडे पाठवले आणि तिला उपचार करण्याचा सल्ला दिला. एवढेच नाही तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावरही उर्वशीने फोनवर मुलीशी बोलून तिच्या प्रकृतीचे अपडेट्स घेतले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे कोणालाही मोठी दुखापत झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

दुसरीकडे उर्वशीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. उर्वशी 365 डेज स्टार मिशेल मॉरोनसोबत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या चित्रपटात काम करणार आहे. ‘ब्लॅक रोज’ या थ्रिलर चित्रपटात उर्वशी मुख्य भूमिकेत दिसणार असून ती साऊथचा चित्रपट थिरुत्तू पायले 2 च्या हिंदी रिमेकमध्येही काम करताना दिसणार आहे. या सर्व प्रकल्पांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात