जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘आज शूटिंगचा शेवटचा दिवस’; ‘अग्गबाई सूनबाई’चा शेवट झाल्यामुळे मॅडी भावुक

‘आज शूटिंगचा शेवटचा दिवस’; ‘अग्गबाई सूनबाई’चा शेवट झाल्यामुळे मॅडी भावुक

‘आज शूटिंगचा शेवटचा दिवस’; ‘अग्गबाई सूनबाई’चा शेवट झाल्यामुळे मॅडी भावुक

अभिनेत्री भक्ती रत्नपारखी (Bhakti Ratnaparkhi) भावूक झाली. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपला अनुभव व्यक्त केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 19 ऑगस्ट**:** **‘**अग्गबाई सूनबाई’ (Aggabai Sasubai) ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मालिकांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. या मालिकेचा उत्तरार्ध सुरू झाला असून लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. परिणामी मालिकेत मॅडी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी (Bhakti Ratnaparkhi) भावूक झाली. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपला अनुभव व्यक्त केला आहे. काय म्हणाली भक्ती? “आज अग्गंबाई सूनबाईमध्ये माझा शेवटचा सीन आहे, म्हणजे मॅडीचा. अग्गंबाई सासूबाईपासून हा प्रवास सुरू झाला होता. मी खूप नशिबवान आहे की मला मॅडी हे इतकं गोड पात्र साकारायला मिळालं. तिचा निरागसपणा, तिचा वेडेपणा मला जगायला मिळाला. कशाचाही जास्त विचार न करणारी, सगळ्यांवर भरभरून नि:स्वार्थी प्रेम करणारी, सगळ्यांशी मैत्री करणारी आणि शेवटपर्यंत ती मैत्री टिकवणारी, आपल्यामधील लहान मूल नेहमी जपून ठेवणारी, इतकी निरागस मॅडी आता मला परत करायला नाही मिळणार, याचं खूप वाईट वाटतंय. मॅडीवर सगळ्यांनी खूप प्रेम केलंय. तुमच्या सर्वांचे त्यासाठी खूप आभार. निवेदिता सराफ ताई, गिरीश ओक सर तुमच्यासोबत मला कधी काम करायला मिळेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. तुमच्याकडून खूप शिकायला मिळालं. मोहन जोशी सर तुमचे आशीर्वाद असेच राहुदेत आणि तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला परत मिळू दे. उमा खूप मज्जा आली तुझ्यासोबत काम करून, खूप सुंदर काम केलंस तू. अद्वैत.. खूप कमी सीन्स होते आपले. पण जे काही सीन्स होते, त्यात मज्जा आली खूप. परत भेटू..लवकरच..एका नवीन भूमिकेत” मलायका अरोरासह विराट कोहली पितात Black Water, काय आहेत या पाण्याचे फायदे वाचा सविस्तर

जाहिरात

टीआरपी घसरल्याने वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निवेदिता सराफ, गिरीश ओक, उमा पेंढारकर, अद्वैत दादरकर, मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात