मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

इंजिनीअर मंदार कसा बनला आत्माराम भिडे? वाचा 'Taarak Mehta' फेम अभिनेत्याचा रंजक किस्सा

इंजिनीअर मंदार कसा बनला आत्माराम भिडे? वाचा 'Taarak Mehta' फेम अभिनेत्याचा रंजक किस्सा

'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोमधील मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकर यांच्या   (Mandar Chandwadkar)  विषयी एक रंजक गोष्ट सांगणार आहोत.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोमधील मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकर यांच्या (Mandar Chandwadkar) विषयी एक रंजक गोष्ट सांगणार आहोत.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोमधील मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकर यांच्या (Mandar Chandwadkar) विषयी एक रंजक गोष्ट सांगणार आहोत.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 7 फेब्रुवारी-   'तारक मेहता का उल्टा चश्मा'  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये आपलं खास स्थान टिकवून आहे. शोमधील प्रत्येक पात्र लोकांच्या पसंतीस उतरलं आहे. हा शो गेल्या 13 वर्षांपासून सतत प्रसारित होत आहे.आणि अजूनही टीआरपी रेसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या शोमधील प्रत्येक पात्र एक उत्तम अभिनेता आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला शोमधील मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकर यांच्या   (Mandar Chandwadkar)  विषयी एक रंजक गोष्ट सांगणार आहोत. गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे   (Aatmaram Bhide)  यांची भूमिका मंदार चांदवडकर साकारत आहेत.

वास्तविक पाहता सुरुवातीपासूनच मंदार चांदवडकर यांना अभिनयाची आवड होती. परंतु प्रत्यक्षात ते खूप शिकलेले आणि व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर होते. त्यांनी अनेक वर्षे दुबईस्थित MNC मध्ये कामही केलं आहे. पण एवढ्या मोठ्या कंपनीत काम करूनही त्यांचा अभिनयाचा मोह काही सुटला नाही. अभिनय हा त्यांचा नेहमीच छंद होता. दुबईत काम करत असतानाच अभिनय करायला हवा, असं त्यांच्या लक्षात आलं आणि नोकरी सोडून ते दुबईहून भारतात परतले.

मायदेशी परतल्यानंतर मंदार चांदवडकर यांनी पहिल्यांदा रंगभूमीवर प्रवेश केला. त्यांनी रंगभूमीवरील अनेक नाटकांमध्ये काम केलं. त्यांनी सुरुवातीच्या काळात मराठी मालिका केल्या आणि हळूहळू त्यांचा अभिनयही बहरत गेला. शेवटी 2008 मध्ये त्यांना 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. ही परिपूर्ण संधी त्यांनी सोडली नाही. त्यांनी शोच्या पात्राबद्दल संपूर्ण माहिती घेतली आणि लगेचच त्यांनी मालिकेला होकार दिला.

अशी मिळाली भूमिका-

मंदार यांना सोनालिका जोशीमुळेच ही भूमिका मिळाली होती. सोनालिकाने या मालिकेत त्यांची पत्नी माधवीची भूमिका साकारली आहे. दोघांनी यापूर्वीही एकत्र काम केलं होतं. सोनालिका जोशी यांनी निर्मात्यांना त्यांचं नाव सुचवलं आणि आत्माराम भिडे यांच्या भूमिकेसाठी मंदार चांदवडकर यांना फायनल करण्यात आलं होतं.'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत काम करताना मंदार चांदवडकरला आता १३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता या व्यक्तिरेखेतून त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली आहे की लोक त्यांना आत्माराम भिडे या नावानेच ओळखू लागले आहेत.

First published:

Tags: Entertainment, Taarak mehta ka ooltah chashma, Tv actor