मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /धक्कादायक! अभिनेत्रींच्या मृत्यूचं सत्र सुरुच,आणखी एका टीव्ही अभिनेत्रीचं निधन

धक्कादायक! अभिनेत्रींच्या मृत्यूचं सत्र सुरुच,आणखी एका टीव्ही अभिनेत्रीचं निधन

मनोरंजन सृष्टीत धक्कादायक प्रकार घडत आहे. अभिनेत्रींच्या मृत्यूचं सत्र सुरुच आहे. पल्लवी डे  (Pallavi De) आणि बिदीशा डे मुजुमदारनंतर (Bidisha De Mujumdar)  आता आणखी एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं बंगाल मनोरंजनसृष्टी हादरली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 27 मे-   मनोरंजन सृष्टीत धक्कादायक प्रकार घडत आहे. अभिनेत्रींच्या मृत्यूचं सत्र सुरुच आहे. पल्लवी डे  (Pallavi De) आणि बिदीशा डे मुजुमदारनंतर (Bidisha De Mujumdar)  आता आणखी एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं बंगाल मनोरंजनसृष्टी हादरली आहे. कारण या 15 दिवसांत घडलेली अशी ही 3घटना आहे. नुकतंच अभिनेत्री मंजूषा नियोगीचं  (Manjusha Neogi)  निधन झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बंगाली अभिनेत्रींच्या मृत्यूचं गूढ अधिक वाढलं आहे.

आज बंगाली अभिनेत्री आणि मॉडेल मंजूषा नियोगीचा मृतदेह तिच्या कोलकत्ता येथील राहत्या घरी आढळून आला. गंभीर बाब म्हणजे अभिनेत्रीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. गेल्या 15 दिवसांत 3 बंगाली अभिनेत्रींचा गूढरित्या मृत्यू झाला आहे. ही खरंच एक आश्चर्यकारक बाब आहे. या तिन्ही अभिनेत्रींचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे सर्वानांच धक्का बसला आहे.

मंजूषा नियोगी या अभिनेत्रीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, बिदीशा आणि मंजुषा फारच चांगल्या मैत्रिणी होत्या. बिदीशाच्या मृत्यूनंतर मंजूषाला मोठा धक्का बसला होता. ती नैराश्यात गेली होती. दरम्यान आज ती आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. ही खरंच आत्महत्या आहे की घातपात याचा पोलिस तपास घेत आहेत. मंजूषाने अनेक मालिकांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या होत्या.

(हे वाचा: राहत्या घरी धक्कादायक अवस्थेत आढळला 21 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा मृतदेह)

यापूर्वी 15 मे रोजी बंगाली टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी डे आपल्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर काल अभिनेत्री बिदीशा डे मुजुमदारचा आपल्या घरी मृतदेह आढळला होता. त्यांनतर आज अभिनेत्री मंजूषाचाही मृत्यू झाल्याने बंगाली मनोरंजनसृष्टी हादरली आहे.

First published:

Tags: Death, Entertainment, Kolkata, Tv actress