Home /News /entertainment /

राहत्या घरी धक्कादायक अवस्थेत आढळला 21 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा मृतदेह

राहत्या घरी धक्कादायक अवस्थेत आढळला 21 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा मृतदेह

मनोरंजन क्षेत्रात धक्कादायक सत्र सुरुच आहे.गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 15 मे रोजी बंगाली अभिनेत्री पल्लवी डेच्या आत्महत्येची बातमी समोर आली होती. या धक्क्यातून बंगाली मनोरंजनसृष्टी अजून सावरलेली नसतानाच त्यांना पुन्हा एक धक्का बसला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 मे- मनोरंजन क्षेत्रात धक्कादायक सत्र सुरुच आहे.गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 15 मे रोजी बंगाली अभिनेत्री पल्लवी डेच्या आत्महत्येची बातमी समोर आली होती. या धक्क्यातून बंगाली मनोरंजनसृष्टी अजून सावरलेली नसतानाच त्यांना पुन्हा एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध मॉडेल आणि नवोदित बंगाली अभिनेत्री बिदीशा डे मुजुमदार  (Bidisha De Mujumdar) आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. बिदीशा डे मुजुमदार ही अभिनेत्री अवघ्या 21 वर्षांची होती. ती आपल्या आई वडिलांसोबत भाड्याने एका अपार्टमेंटमध्ये राहात होती. बुधवारी बिदीशा आपल्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. ही खरंच आत्महत्या आहे की हत्या याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पोलिस अभिनेत्रीच्या कुटुंबियांसोबतच तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींचीदेखील चौकशी करत आहेत.ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र पोलीस अद्याप शविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहेत. Haryana Singer Death: धक्कादायक! रस्त्याकडेला पुरलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध गायिकेचा मृतदेह बिदीशा डे मुजुमदार ही एक लोकप्रिय मॉडेल होती. तसेच तिने 2021 मध्ये अनिरबेद चटोपाध्याय दिग्दर्शित 'भार: द क्लाऊन' या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. या शॉर्ट फिल्ममध्ये प्रसिद्ध बंगाली अभिनेता देबराज मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसला होता. काही दिवसांपूर्वी बंगाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी डे ही कोलकत्ता येथील गरफा भागातील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती आणि तिच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाचा पोलिस अजूनही तपास करत आहेत. दरम्यान आता बिदीशाच्या मृत्यूने खळबळ माजली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Actress, Death, Entertainment

    पुढील बातम्या