मुंबई, 23 सप्टेंबर : अभिनेता सलमान खानसह (Salman Khan) बिग बॉसच्या नव्या सीझनसाठी (Bigg Boss 14) सर्व टीम सज्ज झाली असून या 14 व्या सीझनचं जोरदार प्रमोशन सुरू करण्यात आलं आहे. यात सलमान खान याच्यासह गेल्या काही भागांमधील विजेते तसंच चर्चेत राहिलेल्या काही चेहऱ्यांचे VIDEO प्रदर्शित करण्यात आले आहेत. यंदाच्या सीझनसाठी ‘अब सीन पालटेगा’ या टॅगलाईनसह हे प्रमोशनल व्हिडीओ प्रसारित करण्यात आले आहेत. ‘बिग बॉस’ या नेहमी चर्चेत राहणाऱ्या रिअलिटी शोच्या 14 व्या सीझनला 3 ऑक्टोबर 2020 पासून सुरुवात होणार आहे. कोरोना (Coronavirus) आणि त्यानंतरचं जग हळूहळू रुळावर येत असल्याचं चित्र या प्रोमोजमध्ये दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊनच कामाला सुरुवात केल्याचे आणि सलमानचे पडद्यामागील काही क्षण दाखवण्यात आले आहेत.
प्रेक्षकांना नेहमीच पडद्यामागच्या घटनांमध्ये खूप रस असतो त्यामुळे यावेळी प्रमोशन करताना शूटिंगवेळी घडलेल्या ‘बिहाइंड द सीन्स’ म्हणजे पडद्यामागच्या गमतीजमतीही या प्रमोंमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. बिग बॉसच्या 13 व्या सीझनमधील विजेता सिद्धार्थ शुक्ला आणि त्याचप्रमाणे अभिनेत्री हिना खान, गौहर खान यांचे देखील व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले आहेत. या प्रमोशनल व्हिडीओमध्ये हिना खानने असे म्हटले आहे की, ‘नाती तोडली नाही, मन दुखवणाऱ्याला कधी सोडलं नाही, नात्यांची केली कदर आणि विजयाचं पारितोषिक न जिंकताही मी झाले विनर. याच जिद्दीने लॉकडाउनही केला पार मात्र आता चित्र बदलणार अर्थात ‘अब सीन पालटेगा.’
Har choti badi chunauti ko kiya @eyehinakhan ne apne jazbe se paar, par #BiggBoss ke ghar mein #AbScenePaltega! #BiggBoss2020 Grand Premiere, 3rd Oct, Saturday raat 9 baje. #BB14 @BeingSalmanKhan @PlayMPL #DaburDantRakshak @TRESemmeIndia @LotusHerbals pic.twitter.com/NOFwgXL0Hu
— ColorsTV (@ColorsTV) September 19, 2020
दुसऱ्या व्हिडीओमध्ये गौहर खानने तिचे अनुभव मांडले आहेत. ती असे म्हणते की, ‘आयुष्य असो वा खेळ मी नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहिले. लॉकडाउन पार केलं आता कुठल्याही संकटाचा सामना करेन. शोच्या नव्या सीझनमध्ये मोठं वादळ येणार कारण ‘अब सीन पलटेगा’.
तर गेल्या सीझनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला असे म्हणतो आहे की, ’ आपल्याबरोबर जर सर्व बरोबर होत असेल तर कोणाची चिंता करायची गरज नाही. या तत्त्वाने मी विजयी झालो आणि लॉकडाउनही पार केला. आता बघूया, माझ्यासारखी टक्कर कोण देणार? कारण ‘अब सीन पलटेगा’.
दरम्यान 14 व्या सीझनचं जोरदार प्रमोशन सुरू असताना यात नैना सिंग, पवित्रा पुनिया,आकांक्षा पुरी, निशांत मलकानी, इजाज खान, विवियन दसेना हे चेहरे दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.