मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'सोनाही सोना होगा...' बप्पी लहरींच्या नातवामध्येही त्यांचीच छबी, गाण्याच्या VIDEO वर 24 लाखांपेक्षा जास्त Views

'सोनाही सोना होगा...' बप्पी लहरींच्या नातवामध्येही त्यांचीच छबी, गाण्याच्या VIDEO वर 24 लाखांपेक्षा जास्त Views

बप्पी लहरी यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या कारकिर्दीत यशाचा टप्पा गाठला आहे. आता त्यांचा नातूही (Bappi Lehri's Grandson new song video) पावलावर पाऊल ठेवत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 17 ऑक्टोबर: भारतीय गायक बप्पी लहरी (Bappi Lehri Songs) यांनी आपल्या गाण्यांनी इतिहास रचला आहे. शिवाय त्यांची 'गोल्डन' स्टाइलही ऐतिहासिक आहे. 1969 मध्ये त्यांनी चित्रपट संगीतामध्ये पहिलं पाऊल टाकलं होतं. मात्र त्यांची गाणी आजही एव्हरग्रीन आहेत. आय एम अ डिस्को डान्सर, रात बाकी, पग घूंगरू ही गाणी तर आजही पार्टी अँथम मानली जातात. बप्पी लहरी यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या कारकिर्दीत यशाचा टप्पा गाठला आहे. आता त्यांचा नातूही (Bappi Lehri's Grandson new song video) पावलावर पाऊल ठेवत आहे. विशेष म्हणजे बप्पी लेहरींच्या नातवामध्येही त्यांचीच छबी पाहायला मिळते. बप्पी लहरींचा नातू रेगो बी, उर्फ ​​ए. स्वस्तिक बन्सल हा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. अवघ्या बारा वर्षांचा असलेल्या स्वस्तिकचं नव गाणं बच्चा पार्टी प्रदर्शित झालं आहे आणि पदार्पणातच स्वस्तिकने रेकॉर्ड केला आहे. YouTube वर "बच्चा पार्टी" या गाण्याने 24 लाखाहून अधिक व्ह्यूज ओलांडले आहेत. त्याच्या लुकचीही या गाण्यानंतर चर्चा होत आहेत. याआधी देखील paparazzi नी दूर्गा पूजेदरम्यानचे काही त्याचे फोटो क्लिक केले होते. त्यावेळी अनेकांना त्याच्यामध्ये बप्पी लहरींचा भास झाला होता. आता त्याचं हे गाणं देखील व्हायरल होत आहे.
विरल भयानी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेक युजर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ज्यानी गाणं अद्याप पाहिलेलं नाही, त्यांनी देखील Sona hi sona hoga अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत. लेहरींचा नातू अगदी त्यांच्यासारखाच दिसत असल्याच्या कमेंट्सही आल्या आहेत.
First published:

Tags: Bollywood

पुढील बातम्या