जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Suchitra Bandekar : 'तो लफडी वगैरे करत...' सुचित्रा बांदेकरांचं नवऱ्याविषयी केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

Suchitra Bandekar : 'तो लफडी वगैरे करत...' सुचित्रा बांदेकरांचं नवऱ्याविषयी केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

आदेश बांदेकर-सुचित्रा बांदेकर

आदेश बांदेकर-सुचित्रा बांदेकर

सुचित्रा आणि आदेश यांच्या नात्याविषयी अजून एक खास गोष्ट समोर आली आहे. नुकतंच झालेल्या एका मुलाखतीत सुचित्राने आदेशविषयी एक खास गोष्ट शेअर केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 जुलै : महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर आणि त्यांची बायको अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांची जोडी लोकप्रिय आहे. दोघांनी अगदी तरुणवयातच एकमेकांशी लग्नगाठ बांधली. दोघे जवळजवळ ४० वर्षांपेक्षा अधिक काळ एकमेकांसोबत आहेत. दोघांच्या नात्याविषयी दोघेही अनेकदा उघडपणे बोलतात. आता सुचित्रा आणि आदेश यांच्या नात्याविषयी अजून एक खास गोष्ट समोर आली आहे. नुकतंच झालेल्या एका मुलाखतीत सुचित्राने आदेशविषयी एक खास गोष्ट शेअर केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या महाराष्ट्रभर गाजतो आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात  वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. 30 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाची गाडी सुसाट धावत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात तब्बल 26 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. दरम्यान याच चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये दिलेल्या एका मुलाखतीतील सुचित्रा बांदेकर यांच्या एका वक्तव्याची चर्चा होतेय.

News18लोकमत
News18लोकमत

अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी या चित्रपटात अगदी वेगळी भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्यांचा लूकही अगदी हटके आहे. या चित्रपटात त्यांच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं दाखवलं आहे. तर या चित्रपटाच्या शेवटी चित्रपटातील नवऱ्याबद्दल त्या काय निर्णय घेतात हेही प्रेक्षकांना पाहायला मिळतं. ‘बीबीसी मराठी’च्या एका मुलाखतीत सुचित्रा याना ‘तुम्ही या चित्रपटातील भूमिकेला  स्वतःशी  किती रिलेट करता?’ असा प्रश्न विचारण्यात आला.  त्यावर त्यांनी अगदी मजेशीर उत्तर दिलं. ‘बाईपण भारी देवा’ची गाडी दहाव्या दिवशीही सुसाट! दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाची छप्परतोड कमाई त्या म्हणाल्या, ‘तिची भूमिका बघून मी रिलेट करू शकले पण तिची गोष्ट मी माझ्या आयुष्याशी रिलेट करू शकले नाही. कारण आदेश खूप चांगला आहे. तो लफडी वगैरे करत नाही किंवा त्या वाट्याला कधी जातही नाही. नाहीतर चित्रपटातील पल्लवी जशी रिॲक्ट झाली आहे त्यापेक्षा चौपट मी रिॲक्ट होईन हे आदेशला माहीत आहे.’ असं मजेदार उत्तर सुचित्रा बांदेकर यांनी दिलं. दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 30 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रात ठिकठिकाणी बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. सोमवार 10 जुलै पर्यंत चित्रपटाने 26. 19 कोटींचा गल्ला जमवला आहे. महाराष्ट्रात महिला वर्ग या चित्रपटाला अजूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. या चित्रपटातील सगळ्याच अभिनेत्रींच्या भूमिकांचं कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात