Home /News /entertainment /

Baahubali 'कटप्पा' फेम सत्‍यराज यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

Baahubali 'कटप्पा' फेम सत्‍यराज यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

Sathyaraj

Sathyaraj

    नवी दिल्ली, 9 जानेवारी: बॉलीवूडसोबतचं आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही( south industries)कोरोनाचा (Corona)शिरकाव झाला आहे. बाहुबली(Baahubali)चित्रपटामध्ये कटप्पा नावाने ओळखले जाणारे दाक्षिणात्य दिग्गज स्टार सत्यराज (Sathyaraj) यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनोशी लढत आहेत. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात (Sathyaraj admitted to hospital in Chennai)आलं आहे. त्याआधी सत्यराज होम आयसोलेशनमध्ये होते. चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना सौम्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकृतीत सुधारणा झाली नसल्‍याने त्यांना 7 जानेवारी रोजी, शुक्रवारी सायंकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यासंदर्भात सत्‍यराज यांच्‍याकडून कुठलीही अधिकृत माहिती किंवा स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही. 67 वर्षीय सत्यराज यांची प्रकृती सुधारण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. दिग्गज अभिनेते सत्यराज तमिळ चित्रपटांचे सुपरस्टार आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपट बाहुबलीमध्ये कटप्पाच्या भूमिकेने त्यांना संपूर्ण देशात लोकप्रियता मिळवून दिली. 1978 मध्ये 'सत्तम एन कायल' या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 1985 मध्ये प्रदर्शित झालेला 'सावी' हा त्यांचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता. त्यांनी प्रदीर्घ काळ प्रॉडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केले. 'बाहुबली' चित्रपटातील 'कटप्पा'च्या भूमिकेने त्याला संपूर्ण देशात वेगळी ओळख मिळाली. गेल्या काही दिवसांत तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी कोविड-19 पॉझिटिव्ह झाले आहेत. साऊथचा सुपरस्टार महेश बाबू, मंचू मनोज, मंचू लक्ष्मी, संगीत दिग्दर्शक तमन, नितीनची पत्नी आणि अभिनेता विश्व सेन यांसारखे अनेक चित्रपट तारे कोरोनाशी युद्ध लढत आहेत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Corona, Covid-19, Covid-19 positive, Entertainment

    पुढील बातम्या