• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'बागबान' चित्रपटाचे पटकथा लेखक शफिक अन्सारी काळाच्या पडद्याआड

'बागबान' चित्रपटाचे पटकथा लेखक शफिक अन्सारी काळाच्या पडद्याआड

अभिनेता धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी 'दोस्त' चित्रपटात एकत्र काम केले होते. यानंतर त्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 1990 मध्ये आलेल्या 'दिल का हिरा' आणि त्यानंतर 'इज्जतदार' या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती.

 • Share this:
  मुंबई, 3 नोव्हेंबर- 'बागबान'चे  (Baghban)  पटकथा लेखक शफीक अन्सारी  (Shafiq Ansari Passes Away)  यांचे आज निधन झाले. आज (३ नोव्हेंबर) सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांचा मुलगा मोहसीन अन्सारी याने वडिलांच्या निधनाच्या दु:खद वृत्ताला दुजोरा दिला आहे. शफीक अन्सारी यांनी 1974 साली पटकथा लेखक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शफीक अन्सारी यांचे वय ८४ वर्षे होते. शफीक मुंबईतील अंधेरी परिसरात अन्सारी कुटुंबासोबत राहत होते. शफीक अन्सारी यांनी 'बागबान'सह अनेक चित्रपटांचे पटकथा लेखन केले आहे. 1974 मध्ये त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 'दोस्त' चित्रपटाची पटकथा त्यांनीच लिहिली होती. अभिनेता धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी 'दोस्त' चित्रपटात एकत्र काम केले होते. यानंतर त्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 1990 मध्ये आलेल्या 'दिल का हिरा' आणि त्यानंतर 'इज्जतदार' या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. नंतर त्यांनी 'प्यार हुआ चोरी-चोरी' चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली, ज्यामध्ये त्यांनी मिथुन आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री गौतमीसाठी ही स्क्रिप्ट लिहिली होती. 2003 मध्ये त्यांनी चित्रपट निर्माते बीआर चोप्रा यांच्यासोबत 'बागबान' चित्रपटासाठी संवाद आणि पटकथा लिहिली. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सलमान खान, महिमा चौधरी यांच्यासह अनेक स्टार्स दिसले होते.
  Published by:Aiman Desai
  First published: