मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: 'बचपन का प्यार' गाण्याचा खरा गायक माहितेय का? सोशल मीडियावर सर्वांना लावलंय वेड

VIDEO: 'बचपन का प्यार' गाण्याचा खरा गायक माहितेय का? सोशल मीडियावर सर्वांना लावलंय वेड

बचपन का प्यार मेरा (Bachpan Ka Pyar) अस हे गाणं सध्या प्रत्येकाच्या ओठांवर गुणगुणताना दिसत आहे. पण या गाण्याचा मूळ गायक नक्की कोण आहे हे माहित आहे का?

बचपन का प्यार मेरा (Bachpan Ka Pyar) अस हे गाणं सध्या प्रत्येकाच्या ओठांवर गुणगुणताना दिसत आहे. पण या गाण्याचा मूळ गायक नक्की कोण आहे हे माहित आहे का?

बचपन का प्यार मेरा (Bachpan Ka Pyar) अस हे गाणं सध्या प्रत्येकाच्या ओठांवर गुणगुणताना दिसत आहे. पण या गाण्याचा मूळ गायक नक्की कोण आहे हे माहित आहे का?

    मुंबई 30 जुलै:  सोशल मीडिया वर सध्या एक लहान मुलगा आणि एक गाणं फारच (Viral on Social Media) चर्चेत आहेत. अगदी त्यांनी प्रत्येकाच्या मोबाईलवर धुमाकूळ घातला आहे. इतकचं नाही तर त्या लहान मुलाचा छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी सत्कार देखील केला. बचपन का प्यार मेरा (Bachpan Ka Pyar) अस हे गाणं सध्या प्रत्येकाच्या ओठांवर गुणगुणताना दिसत आहे. पण या गाण्याचा मूळ गायक नक्की कोण आहे हे माहित आहे का?

    व्हायरल होणाऱ्या या लहान मुलाचं नाव सहदेव कुमार दिर्डो असं आहे. सध्या या मुलाच्या आवाजातील गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. अगदी मोठमोठे सेलिब्रिटीही त्याच्या हा गाण्यावर रील्स आणि व्हिडीओज बनवत आहेत. दरम्यान 2019 साली सहदेवच्या शाळेतील शिक्षकाने या गाण्यावर व्हिडीओ शुट केला होता. पण आता हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे.

    सध्या सगळीकडे या गाण्याची जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मालाही या गाण्याचा मोह आवरला नव्हता. तर ट्रेंडींगमध्येही बचपन का प्यार पाहायला मिळत होतं. अनेक युजर्सनी यावर व्हिडीओज रेक्रियेट केले आहेत. तर काहींनी लहान सहदेवच कौतुकही केलं आहे. नेटकऱ्यांना सध्या हे गाणं वेड लावत आहे.

    हे वाचा-सही रे सई! साउथ सुपरस्टारसह दिसणार मराठमोळी अभिनेत्री, Mimiनंतर या दमदार भूमिकेत

    प्रसिध्द रॅपर, गायक बादशाहने या गाण्याचं मजेशीर रिमिक्स बनवलं आहे. अनेक स्टार्सनी त्यावर व्हिडीओज बनवले होते. हे मूळ गाणं गुजरातच्या एका कमलेश बरोट नावाच्या आदिवासी गायकाने गायलं होतं. 2018 साली हे गाणं तयार झालं होतं. गाण्याला मयूर नदीया यांनी म्युजिक दिलं होतं. याचे गीतकार पी पी बरिया हे आहेत. ओरिजनल गाणंही त्यावेळी सुपरहिट ठरल होतं. सध्या या गाण्याला 47 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.

    " isDesktop="true" id="586080" >

    आज तकला दिलेल्या मुलाखतीत कमलेशने सांगितल की त्यांनी आजपर्यत 6000 हून अधिक गाणी गायली आहेत. तसेच त्यांनी लहान सहदेवचही कौतुक केलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Social media viral, Video Viral On Social Media