मुंबई 30 जुलै: अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या खूपच चर्चेत आहे. नुकताच तिचा ‘मीमी’ (Mimi) हा बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यातील तिच्या कामाचही विशेष कौतुक होत आहे. सोशल मीडियावर तिच्या कामाचं कौतुक करताना सहकलाकार आणि चाहते थकत नाही आहेत. पण सईचा प्रवास केवळ बॉलिवूड पुरता मर्यादित न राहता आता साऊथ पर्यंत जाऊन पोहोचला आहे. सई लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘नवरसा’ (Navrasa) वेबसीरिज मध्ये दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर (Netflix) ही तमिळ वेबसीरिज दिसणार आहे. दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपती (Vijay Setupati) सोबत ती झळकणार आहे. सईने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ती तिने विजय सोबत फोटो पोस्ट केला आहे तर त्यावरील कॅप्शनने साऱ्यांच लक्ष वेधलं आहे. तमिळ भाषेत तिने हे कॅप्शन लिहिलं आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते मणिरत्नम (Maniratnam) यांच्या नवरसा या सीरिज मध्ये ती दिसणार आहे. 9 रस अर्थात राग, करुणा, धैर्य, द्वेष, भीती, हशा, प्रेम, शांती आणि आश्चर्य या भावना यातून मांडल्या जाणार आहेत. मणिरत्नम यांच्या या आगळ्या वेगळ्या सीरिज मध्ये या प्रकारावर प्रकाश टाकला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या सिरिजच ट्रेलर प्रदर्शित झाल होतं. सूर्या, सिद्धार्थ, प्रकाश राज, विजय सेतुपति, रेवती, ऐश्वर्या राजेश असे कलाकारही त्यात दिसले होते. सईच्या या नव्या प्रोजेक्ट मुळे तिच्या चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान या सीरिजमधून होणारी कमाई गरजू कलावंतांना दिली जाणार आहे.

)







