जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'बचपन का प्यार' फेम चिमुकल्याला मिळणार नवी ओळख; हा प्रसिद्ध गायक घेणार म्यूझिक अल्बममध्ये

'बचपन का प्यार' फेम चिमुकल्याला मिळणार नवी ओळख; हा प्रसिद्ध गायक घेणार म्यूझिक अल्बममध्ये

'बचपन का प्यार' फेम चिमुकल्याला मिळणार नवी ओळख; हा प्रसिद्ध गायक घेणार म्यूझिक अल्बममध्ये

अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर व्हिडिओज शेअर केले. त्यामुळे सहदेव कुमार दिर्दो (Sahadev Kumar Dirdo) हा लहान मुलगा लोकप्रिय होताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 3 ऑगस्ट :  सध्या संपूर्ण सोशल मीडियावर ज्या एका गाण्याने प्रचंड धुमाकूळ घातला आहे, ते गाणं गाणारा मुलगा देखील तितकाच लोकप्रिय होताना दिसतोय. ‘बचपन का प्यार मेरा’ (Bachpan Ka Pyar Mera)  हा गाणं गाणारा लहानगा सहदेव फारच व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर व्हिडिओज शेअर केले. त्यामुळे सहदेव कुमार दिर्दो (Sahadev Kumar Dirdo) हा लहान मुलगा लोकप्रिय होताना दिसत आहे. तब्बल 2 वर्षांपूर्वी त्याने गायलेल हे गाणं आता मात्र व्हायरल होत आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनाही या गाण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही सहदेवची भेट घेऊन त्याच्याकडून हे गाणं गाउन घेतलं. तर आता त्याला एक म्यूझिक अल्बमही मिळाला आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर , गायक बादशाहने (Badshah) आता सहादेवला त्याच्या आगामी अल्बम मध्ये घ्यायचं ठरवलं आहे. बादशाहने त्याला चंदिगढला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यानंतर नुकताच बादशाहने सहदेव सोबत एक फोटो शेअर केला आहे. तो प्रचंड व्हायरल होत आहे.

जाहिरात

बादशाह ने शेअर केलेल्या पोस्टवर प्रचंड लाईक्स मिळत आहेत. तर त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याचं अभिनंदन ही केलं आहे. त्यामुळे बादशाहच्या कोणत्या नव्या अल्बम मध्ये सहदेव दिसणार किंवा गाणार याची आता त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. (Bachpan ka pyar viral boy) दरम्यान 2 वर्षांपूर्वी सहादेवच्या शाळेतील शिक्षिकेने त्याचा हा व्हिडिओ शुट केला होता. पण सहदेव ने ज्या आत्मविश्वासाने ते गायलं त्यावर अनेक नेटकरी फिदा होताना दिसले. त्याचा अंदाज अनेकांना आवडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात