28 एप्रिल : आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट ‘बाहुबली 2’ हा सिनेमा तेलगु, तमिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये आज अखेर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली आणि प्रभास यांच्या बहुप्रतिक्षित ‘बाहुबली 2’ या सिनेमाने आतापासूनचं बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडायला सुरूवात केली आहे. देशातल्या सर्वच प्रमुख शहरांमधील मल्टिप्लेक्समध्ये अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल झाले असून, बाहुबलीने आमिर खानच्या ‘दंगल’लाही मागे टाकलं आहे. तब्बल 6000हून अधिक स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज होतोय. तर ‘बूक माय शो’ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसात तिन्ही भाषांना मिळून बाहुबलीची किमान 10 लाख तिकिटं विकली गेली आहेत. एवढंच नाही तर, देशभरात या चित्रपटच्या तिकिटांची किंमतही वेगवेगळा आहे. दिल्लीत, या चित्रपटाचं किंमत 2400 वर येऊन पोहोचली आहे. तर अमेरिकेत या चित्रपटासाठी चाहत्यांना 40 डाॅलर मोजावे लागणार आहेत. या सिनेमाच्या हिंदी भागाची सर्व हक्क करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला बाहुबली हा हिंदी भाषेत डब झालेला आणि बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला मिळवणारा पहिलाच सिनेमा ठरला होता. देशातल्या सर्वच प्रमुख शहरांमधील मल्टिप्लेक्समध्ये अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल असल्याचं समजतं. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांत चित्रपट २५० कोटींची कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘बाहुबली : द बिगिनिंग हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. मात्र कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात अपूर्ण राहिलं. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलची सर्वांना उत्सुकता लागली होती. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.