जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आयुषमान खुरानाच्या पत्नीनं केला बिकीनी VIDEO शेअर; कॅप्शनमधून 'फाटक्या' मानसिकतेला दिली चपराक

आयुषमान खुरानाच्या पत्नीनं केला बिकीनी VIDEO शेअर; कॅप्शनमधून 'फाटक्या' मानसिकतेला दिली चपराक

आयुषमान खुरानाच्या पत्नीनं केला बिकीनी VIDEO शेअर; कॅप्शनमधून 'फाटक्या' मानसिकतेला दिली चपराक

बॉलीवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाची (Ayushmann Khurrana) पत्नी ताहिरा कश्यपनेही (Wife Tahira Kashyap) उडी घेतली आहे. तिने सोशल मीडियावर एक बिकीनी व्हिडिओ (Bikini Video) शेअर करत, फाटक्या मानसिकतेला उपरोधिकपणे चपराक लगावली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मार्च: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (CM Tirath Singh Rawat) यांनी अलीकडेच महिलांच्या फाटक्या जीन्ससंदर्भात वादग्रस्त विधान (Ripped jeans Controversial Statement) केलं होतं. मुख्यमंत्री रावत यांच्या विधानावर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी आक्षेप घेतला होत. तर अनेक नेटकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना ट्रोल केलं होतं. असं एकंदरित देशातलं वातावरण असताना, आता या वादात बॉलीवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाची (Ayushmann Khurrana) पत्नी ताहिरा कश्यपनेही (Wife Tahira Kashyap) उडी घेतली आहे. तिने सोशल मीडियावर एक बिकीनी व्हिडिओ (Bikini Video) शेअर करत, फाटक्या मानसिकतेला उपरोधिकपणे चपराक लगावली आहे. ताहिराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतं असून अनेक चाहत्यांनी तिचं समर्थन केलं आहे. बॉलीवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप तिच्या सडेतोड स्वभावासाठी ओळखली जाते. ती अनेकदा देशातील ज्वलंत मुद्यांवर आपलं मत मांडत असते. आताही तिने उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ताहिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बिकीनी मध्ये दिसत आहे. तिने या व्हिडिओला एक खास कॅप्शन लिहिलं आहे. ज्यामुळे हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. ताहिरा कश्यपने बिकिनी व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘किमान फाटकी जीन्स तरी परिधान नाही केली’. या व्हिडिओच्या माध्यमातून ताहिराने उपरोधिकपणे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना नाव न घेता टोला लगावला आहे. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये गर्दी केली आहे. अनेकांनी तिच्या या लुकचं आणि सडेतोडपणाचं कौतुक केलं आहे.

जाहिरात

हे ही वाचा - आयुष्यमान खुरानासाठी पत्नी ताहिराचा भावनिक VIDEO; प्रेमाच्या आठवणींना दिला उजाळा आयुष्यमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रसिद्ध लेखिका आहे. ती चित्रपटासाठी पटकथा लिहिण्याचं काम करते. अलिकडेच तिने नेटफ्लिक्सवरील वेब मालिका ‘जिंदगी इन शॉर्ट’ यातील एका एपिसोडसाठी पटकथा लिहिली आहे. त्याचबरोबर तिने अलिकडेच तिच्या लग्नाचा विसावा वाढदिवस साजरा केला आहे. तिने पती आयुष्यमान खुरानाला खास शैलीत शुभेच्छा दिल्या होत्या. तिने जुन्या फोटोंच्या माध्यमातून दोघांच्या प्रेमाचा प्रवास उलगडाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात