Home /News /entertainment /

म्हणे कोरोनामुळे बॉलिवूडमध्ये बेरोजगारी...; आता या अभिनेत्याने तब्बल 3 कोटींची कार केली खरेदी

म्हणे कोरोनामुळे बॉलिवूडमध्ये बेरोजगारी...; आता या अभिनेत्याने तब्बल 3 कोटींची कार केली खरेदी

कोरोनामुळे बॉलिवूडमध्ये बेरोजगारी वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात तर वेगळीच परिस्थिती आहे.

  नवी दिल्ली, 11 जुलै :  कोरोनामुळे बॉलिवूडमध्ये बेरोजगारी (Corona causes unemployment in Bollywood) वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. चित्रीकरण अद्याप नियमित सुरू नसल्यामुळे अनेक प्रोजेक्ट रखडल्याचं म्हटलं जात आहे. मात्र असं असताना अनेक अभिनेता-अभिनेत्री नवं घर, कार खरेदी करीत असल्याचं दिसत आहे. नुकतच प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना याने एक लग्जरी कार Mercedes-Maybach GLS600 खरेदी केली (Ayushman Khurana bought a luxury car) आहे. याचा एक व्हिडीओ बॉलीवुडच्या एका फोटोग्राफर varindertchawla ने पोस्ट केला आहे. या एसयूवीच्या एक्स-शोरूमची किंमत 2.43 कोटी रुपये आहे. आयुष्मानकडे किती आहेत गाड्या - आयुष्मान खुरानाकडे अनेक लग्जरी कार आहेत. ज्यात Audi A6 saloon, BMW 5 Series आणि Mercedes Benz S Class लग्जरी सेडान यांचा समावेश आहे. हे ही वाचा-‘भीक नको मला काम द्या’; लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या अभिनेत्याची व्यथा
  देशात कोरोना व्हायरसची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत आहे. मात्र तरी देशावरील कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. देशात कोरोनाव्हायरस संक्रमणासंदर्भात केलेल्या गणितीय अभ्यासानुसार, भारतातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली. मात्र रिप्रोडक्टिव्ह नंबर (R number) किंवा आर नंबरमध्ये एप्रिलच्या मध्यानंतर पहिल्यांदा पुन्हा एकदा संख्येमध्ये वाढ दिसून आहे.
  कोविड19 (Covid-19) चा संसर्ग किती वेगाने पसरतो हे सांगण्यासाठी आर क्रमांक एक प्रकारचा सूचक आहे. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून देशात सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. असं असलं तरी अद्याप सर्वच क्षेत्र पूर्णपणे खुलं करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकांना याचा फटका सहन करावा लागत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Ayushmann Khurrana, Bollywood, Bollywood actor, Coronavirus

  पुढील बातम्या