मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Avatar 2 trailer | तब्बल 12 वर्षातून एक चित्रपट; कमाई जगात सर्वाधिक, आता तिसरा रेकॉर्ड मोडणार का?

Avatar 2 trailer | तब्बल 12 वर्षातून एक चित्रपट; कमाई जगात सर्वाधिक, आता तिसरा रेकॉर्ड मोडणार का?

हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा ‘अवतार 2’ हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दिसणार आहे.

हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा ‘अवतार 2’ हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दिसणार आहे.

हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा ‘अवतार 2’ हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दिसणार आहे.

मुंबई, 27 एप्रिल : 2009 साली हॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये समाविष्ट झालेला दिग्दर्शक जेम्स कॅमेरूनचा 'अवतार 2' चित्रपटाची सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. गेल्या 13 वर्षांपासून चाहते या चित्रपटाच्या सीक्वलची वाट पाहत होते. आता मात्र चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत आहे. तर 16 डिसेंबर 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हा रिलीज होणार आहे. जेव्हा या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्षित झाला होता. तेव्हा त्याने कमाईचे सर्व आकडे मोडले होते. आता याचा दुसरा पार्ट आपला रेकॉर्ड मोडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवतारची कमाई कशी होती?

हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट अवतार हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपट वितरक कंपनी सेंच्युरी फॉक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अवतारने हॉलिवूडचा दुसरा प्रसिद्ध आणि कमाई करणारा चित्रपट टायटॅनिकलाही मागे टाकले आहे. अवघ्या सहा आठवड्यांत अवतारची कमाई 1 अब्ज 85 डॉलर होती, तर Titanic ची कमाई 1 अब्ज 84 कोटी डॉलर होती. पण हे आकडे महागाईनुसार किंवा अवतारच्या महागड्या तिकिटांनुसार दुरुस्त केलेले नाहीत.

दोन्ही चित्रपट एकाच दिग्दर्शकाचे

जगातील सर्वाधिक कमाई करणारे हे दोन्ही चित्रपट जेम्स कॅमेरून यांनी दिग्दर्शित केले होते. 1997 मध्ये बनलेला टायटॅनिक हा चित्रपटही त्यावेळी बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे विक्रम रचणारा चित्रपट ठरला. टायटॅनिकसाठी कॅमेरूनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर मिळाला होता.

तब्बल 12 वर्षांनंतर, जेव्हा त्याने आपला नवीन चित्रपट अवतार सादर केला, तेव्हा पुन्हा एकदा त्याने आपल्या चित्रपटातील भव्यतेचे सर्व रेकॉर्ड मोडले. अवतारला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते. ऑस्करसाठी देखील ह्या चित्रपटाला नामांकन मिळालं आहे.

'...तर मग हिंदीत तुमचे चित्रपट डब का करता?' साऊथ सुपरस्टारला अजय देवगणने सुनावलं!

सर्वात महागडा चित्रपट

हा चित्रपट 23 कोटी डॉलरच्या बजेटमध्ये बनवला गेला होता, ज्याला तेव्हाचा सर्वात महागडा चित्रपट म्हटले गेले आहे. जेम्स कॅमेरून हे त्यांच्या तांत्रिक पराक्रमासाठी ओळखले जातात. ते त्यांच्या चित्रपटांमध्ये तंत्रज्ञानाचा सुंदर वापर करतात.

अवतार ही 3D ची डिजिटल जादू

या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यासाठी खास थ्रीडी कॅमेरा प्रणाली विकसित करण्यात आली होती, ज्यामुळे स्पेशल इफेक्ट्स अधिक चांगल्या प्रकारे बनवता आले. खास थ्रीडी चष्मा घालून थिएटरमध्ये बसल्यानंतर अंधार पडताच पडद्यावर मायावी जग आकार घेत होतं.

कसा असेल अवतार 2

जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार' या चित्रपटाच्या सिक्वेलची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या निर्मितीच्या सुरुवातीपासूनच, अवतारच्या सिक्वेलच्या कथेबद्दल काहीही उघड न करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. यामुळेच ते 'अवतार 2' शी संबंधित कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाहीये. मात्र, सिनेमाची पहिली झलक सिनेमाकॉनवर पाहायला मिळणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. विज्ञान-कथा फ्रँचायझीचा दुसरा भाग, 'अवतार 1' चित्रपट रिलीज झाल्यानंतर जवळपास 13 वर्षांनंतर 16 डिसेंबरला हा चित्रपट येणार आहे.

First published:

Tags: Movie release