मुंबई 20 मार्च: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता प्रेम कुमार तिवारीवर (Prem Kumar Tiwari) जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मालिकेत काम करणाऱ्या एका ज्युनिअर आर्टिस्टनं त्याच्यावर हा हल्ला केला. सध्या प्रेमवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी गोरेगांवमधील फिल्मसीटीतून हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली. पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. (Attack on actor Prem Kumar Tiwari)
प्रकरण काय आहे?
12 मार्च रोजी प्रेम कुमार तिवारी नेहमीप्रमाणेच मालिकेचं चित्रीकरण करण्यासाठी गोरेगांवमधील फिल्मसीटीमध्ये गेला होता. शूटिंग करत असताना कुठल्याशा संवादावरुन त्याचं ज्युनिअर आर्टिस्टसोबत भांडण झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भांडण करणाऱ्या व्यक्तीचं नाव राज अहिवार सिंह असं आहे. तो प्रेमवर संतापला अन् त्यानं त्याच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला केला. निर्माते, दिग्दर्शक आणि सेटवरील इतर लोक त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तरी देखील तो थांबला नाही. या भांडणामध्ये प्रेम जबरदस्त जखमी झाला आहे.
अवश्य पाहा - 'अक्षय कुमारकडे आता 2-3 वर्षचं शिल्लक'; अभिनेत्याचं ट्विट होतंय व्हायरल
पोलिसांनी राज अहिवार सिंह याला अटक केली आहे. पोलिसांनी 323, 324, 506 आणि 404 या कलमा अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. प्रेमनं आजवर ‘सीआईडी’, ‘क्राइम पेट्रोल’,’थपकी प्यार की’, ‘प्रतिज्ञा’, ‘अनगिनत’ यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Entertainment, Sony tv