मुंबई, 28 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे आतापर्यंत सर्वांनाच माहिती झालं आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या लग्नाबाबतदेखील अनेकवेळा बातम्या आल्या आहेत, मात्र दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. तत्पूर्वी आता अथियाने राहुलसोबतच एक रोमँटिक फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अथिया आणि केएल राहुल दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत आपले रोमँटिक फोटो शेअर करत असतात. त्यांची जोडी अनेकांना पसंत पडते. चाहते त्यांच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहात असतात. नुकतंच अथियाने राहुलसोबतचा तिचा आवडता फोटो शेअर केला आहे.हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. शिवाय हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्यात फारच छान बॉन्डिंग आहे. फक्त फोटोमध्येच नव्हे तर खऱ्या आयुष्यातसुद्धा हे दोघे एकमकमेकांच्या फार जवळ आहेत. त्यांना एकमेकांची प्रचंड काळजीही आहे. याचा प्रत्यय नुकतंच दिसून आला. टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलची नुकतीच जर्मनी एक शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी अथियासुद्धा त्याच्यासोबत होती. दरम्यान आता अथियाने राहुलसोबतचा एक रोमँटिक फोटोही शेअर केला आहे.या फोटोवर चाहत्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सर्वच सुंदर अशा कमेंट्स करत आहेत.
**(हे वाचा:** Huma Qureshi B’day: महागड्या कार, रेस्टॉरंट्स गर्भश्रीमंत आहे हुमा कुरेशी! तरीही स्वतः कमावली इतक्या कोटींची संपत्ती ) अथिया आणि राहुल सृष्टीतील एक चर्चित कपल बनले आहेत. हे दोघे जवळपास 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अथियाचा भाऊ अहानच्या ‘तडप’ या चित्रपटाच्या प्रीमियरला राहुल पहिल्यांदा अथिया आणि तिच्या कुटुंबासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसून आला होता. त्यांनतर या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाला होता. आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता आहे.