मुंबई, 27 मे- बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने खलनायकाची भूमिका साकारणारा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आशिष विद्यार्थी यांचं नाव घेतलं जातं. आशिष विद्यार्थीनी नुकतंच दुसरं लग्न केलं आहे. आसामच्या रुपाली बरुआसोबत लग्नगाठ बांधत ते वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा नवरदेव बनले आहेत. अभिनेत्याचं पहिलं लग्न राजोशी यांच्याशी झालं होतं. त्यांनी इंडस्ट्रीत डान्सर आणि सिंगर म्हणूनही काम केलं आहे. दोघांनी एकमेकांना वर्षानुवर्षे साथ दिली, पण आता वयाच्या या टप्प्यावर दोघेही विभक्त झाले आहेत. दरम्यान आता अभिनेत्याची दुसरी पत्नी रुपाली चर्चेत आली आहे. या दोघांकडे अमाप संपत्ती असल्याचंदेखील म्हटलं जात आहे. आज आपण आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ या दोघांच्या नेटवर्थबाबत जाणून घेणार आहोत.
आशिष विद्यार्थी हे एक कुशल अभिनेते आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटांसोबतच तेलुगू, तमिळ, मराठी, कन्नड, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारत आशिष विद्यार्थी यांनी आपण किती प्रतिभावान आहे याची प्रचिती आणून दिली आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते आशिष यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच चकित केलं आहे.आशिष यांनी रुपालीसोबत गुरुवारी कोर्टमॅरेज करत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
आशिष विद्यार्थी संपत्ती-
आशिष विद्यार्थी यांनी आपल्या सिने करिअरमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्यासोबत काम केलं आहे. त्यांनी आजपर्यंत जवळपास ३०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आशिष विद्यार्थी यांना पडद्यावरील लोकप्रिय खलनायक म्हटलं जातं. अभिनेते आपल्या एका चित्रपटासाठी तब्बल 25 लाख ते 1 कोटी रुपये मानधन आकारतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिष यांच्याकडे 10 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर, 60 वर्षांचे हे अभिनेते तब्बल 82 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
रुपाली बरुआ संपत्ती-
आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या पत्नी या व्यवसायाने एक फॅशन इंटरप्रिटर आहेत. त्या स्वतःच्या ब्रँडसाठी मॉडेलिंगसुद्धा करतात. विशेष म्हणजे त्या महिन्याला 10 लाखांची कमाई करतात. सोशल मीडियावर त्यांचे सुंदर फोटो पाहायला मिळतात. रिपोर्ट्सनुसार त्यांच्याकडे 1 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. अर्थातच रुपाली या 8 कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत.
फार कमी लोकांना माहित आहे की, आशिष यांनी पहिलं लग्न अभिनेत्री राजोशी विद्यार्थीशी केलं होतं. राजोशी या व्यवसायाने एक सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि नाट्य कलाकारदेखील आहेत. दोघेही एका मुलाचे पालक आहेत ज्याचं नाव अर्थ विद्यार्थी आहे. आशिषची पत्नी राजोशी लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करते पण त्या खूप सुंदर आहेत.आशिषची पहिली पत्नी राजोशी ही प्रसिद्ध अभिनेत्री शकुंतला बर्वा यांची मुलगी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment