जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ashish Vidyarthi: साठीत आशिष विद्यार्थी कसे पडले रुपालींच्या प्रेमात? कुठे झालेली भेट? समोर आलं पत्नीचं वय

Ashish Vidyarthi: साठीत आशिष विद्यार्थी कसे पडले रुपालींच्या प्रेमात? कुठे झालेली भेट? समोर आलं पत्नीचं वय

आशिष विद्यार्थी रुपाली बरुआ यांची पहिली भेट कशी झालेली माहितेय का?

आशिष विद्यार्थी रुपाली बरुआ यांची पहिली भेट कशी झालेली माहितेय का?

Ashish Vidyarthi Second Marriage: बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या साठीत वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. नुकतंच या अभिनेत्याने आसामच्या रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केलं आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 जून- बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. नुकतंच या अभिनेत्याने आसामच्या रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केलं आहे. या अभिनेत्याने काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केलं आहे. त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे ते बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. आता अभिनेत्याने पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याच्या वेदना काय होत्या याबाबत खुलेपणाने सांगितलं आहे. तसेच ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीला ते केव्हा आणि कसे भेटले हे देखील सांगितलं आहे. आशिष विद्यार्थी यांनी 25 मे रोजी रुपाली बरुआशी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वयाच्या 57व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांचं दुसरं लग्न पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. ही बातमी समोर येताच सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले की आशिष विद्यार्थीने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे का? त्यांची पहिली पत्नी कुठे आहे? आता आशिष विद्यार्थ्याने त्यांचं पहिलं लग्न मोडणं आणि दुसऱ्या पत्नीसोबत झालेल्या पहिल्या भेटीबद्दल बरंच काही सांगितलं आहे. यासोबतच पहिलं लग्न मोडल्याचं दुःखही व्यक्त केलं आहे. (हे वाचा: Sanjay Dutt Wife: संजय दत्तची पहिली पत्नी होती लोकप्रिय अभिनेत्री; ऐन तारुण्यात झालेला मृत्यू,काय होतं कारण? ) नुकतंच बॉलिवूड अभिनेता आशिष यांनी त्यांच्या एका मुलाखतीत दुसरी पत्नी रुपाली बरुआसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं आहे. याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं- मी रुपालीला गेल्या वर्षी एका व्लॉगिंग असाइनमेंट दरम्यान पहिल्यांदा भेटलो होतो. यानंतर आशिष आणि रुपालीचं बोलणं सतत सुरुच होतं. आणि नंतर आशिष यांना समजलं की, रुपाली यांनी आपल्या आयुष्यात प्रचंड वेदना सहन केल्या आहेत. आपल्या संभाषणात आशिष यांनी सांगितलं की, रुपालीने पाच वर्षांपूर्वी तिचा पहिला नवरा गमावला होता. तिच्या पतीने या जगाचा निरोप घेतला आहे. पती गमावल्यानंतर तिने दुस-या लग्नाचा विचार कधीच केला नव्हता. पण जेव्हा दोघांमध्ये गोष्टी घडू लागल्या तेव्हा तिला समजलं की, दोघेही दुसऱ्या लग्नाचा विचार करु शकतात आणि नवीन सुरुवात करु शकतात. त्यांनी बोलताना आपल्या वयाचा उल्लेखदेखील केला आहे की आशिष स्वतः 57 वर्षांचे आहेत आणि रुपाली 50 वर्षांची आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान राजोशी या आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर झालेल्या वेदनांबद्दल बोलताना आशिष यांनी सांगितलं की, दोघांच्याही लग्नाच्या बऱ्याच आठवणी आहेत. ते म्हणाले की, पीलू ही केवळ त्यांच्या मुलाची आईच नव्हे तर त्यांची चांगली मित्र आणि पत्नीदेखील होती. राजोशीपासून विभक्त झाल्यानंतर त्यांना बराच काळ वियोगाच्या वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. या दोघांसाठी हा काळ खूप कठीण होता असंही ते म्हणाले'.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात