स्वामिनी मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री कुंजिका काळवीट नुकतीच गिरगावच्या वारीत सहभागी झाली होती.
गिरगावच्या वारीचा अनोखा थाट यावेळी पाहायला मिळाला. करकटेवरी ठेवून उभ्या छोट्या विठ्ठल आणि रुक्कमीणीचं दर्शन घेता आलं.
कुंजिकाला आपण नेहमीच पारंपारिक लुकमध्ये पाहत आलो आहोत. तिचा हा लुक चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरतो.
गिरगावातील गुढीपाडव्याचा शोभायात्रेतही कुंजिकाला नटून थटून कधी झांजा वाजवताना तर कधी ढोल वाजवताना आपण पाहिलं आहे.
स्वामीनी या मालिकेशिवाय कुंजिका 'चंद्र आहे साक्षीला', 'ती परत आलीय' सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.