Home /News /entertainment /

'खाना खाया..?' 10 मिनिटांच्या भेटीत काय झाला बापलेकात संवाद? आर्यनला गजाआड पाहताच शाहरुख भावुक

'खाना खाया..?' 10 मिनिटांच्या भेटीत काय झाला बापलेकात संवाद? आर्यनला गजाआड पाहताच शाहरुख भावुक

आज इतक्या दिवसांनी आर्यनला पाहिल्यानंतर तेही जेलच्या चार भींतींच्या आतमध्ये तेव्हा शाहरुख भावुक (Aryan Khan and Shah Rukh Khan Meet) झाला होता. वाचा या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

    मुंबई, 21 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला (Aryan Khan in Jail) भेटण्यासाठी आर्थर जेलमध्ये पोहोचला होता. यावेळचे शाहरुखचे काही व्हिडीओ आणि फोटो देखील समोर आले होते. आर्यन खानला अटक (Aryan Khan Drug Case) झाल्यानंतर आज पहिल्यांदा शाहरुख आणि आर्यनची भेट झाली.  याआधी आर्यनशी शाहरुख व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण करू शकला होता. मीडिया अहवालांनुसार, आज इतक्या दिवसांनी आर्यनला पाहिल्यानंतर तेही जेलच्या चार भींतींच्या आतमध्ये तेव्हा शाहरुख भावुक (Aryan Khan and Shah Rukh Khan Meet) झाला होता. वाचा या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? आर्थर जेलमध्ये पोहोचला शाहरुख आज सकाळी साधारण सव्वानऊच्या सुमारास शाहरुख आर्थर जेलमध्ये आर्यनच्या भेटीसाठी पोहोचला होता. त्याची आणि आर्यनची साधारण दहा मिनिटं भेट झाली. कोरोना मुळे बंदी असलेल्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येत नव्हते मात्र आज पासुन दोन व्यक्तींना भेटता येणार आहे. त्यामुळे शाहरूख खाने आज आर्यनची भेट घेतली. या दरम्यान मीडियाने शाहरुखला घेरले होते. मात्र कुणालाही प्रक्रिया न देता शाहरुख थेट आर्थर जेलमध्ये पोहोचला होता. वाचा-Aryan Khan Drugs Caseमध्ये धक्कादायक वळण,या बड्या अभिनेत्रीच्या घरावर NCBचा छापा बापलेकांच्या भेटीदरम्यान दोघंही भावुक झाले होते. शाहरुखने त्याला जेवण केलंस का असाही प्रश्न विचारला. त्यावर आर्यनने नाही असं उत्तर दिलं होते. शाहरुखने जेलच्या अधिकाऱ्यांना विचारलं की ते काही त्याला खायला देऊ शकतात का? न्यायालयाच्या परवानगीशिवाय काही देता येणार नाही असं उत्तर यावेळी शाहरुखला मिळालं. एबीपी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. साधारण सकाळी 9.35 च्या दरम्यान शाहरुख जेलमधून रवाना झाला. त्यावेळी परिसरात बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम वाढला क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. एनडीपीएस कोर्टाने त्याचा जमीन काल पुन्हा फेटाळून लावला आहे. आर्यन खानचा जामीन काल न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी या तिघांच्या जामिनावर सुनावणी ठेवली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: NCB, Shah Rukh Khan

    पुढील बातम्या