मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aryan Khanला जामीन मिळाल्यानं आनंदात आहे Shahrukh khan; नव्या नवरीसारखं नटलं 'मन्नत'

Aryan Khanला जामीन मिळाल्यानं आनंदात आहे Shahrukh khan; नव्या नवरीसारखं नटलं 'मन्नत'

बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेता शाहरुख खानचा  (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान(Aryan Khan Bail)  याला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्याने खान कुटुंबापासून ते संपूर्ण बॉलिवूडमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान(Aryan Khan Bail) याला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्याने खान कुटुंबापासून ते संपूर्ण बॉलिवूडमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान(Aryan Khan Bail) याला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्याने खान कुटुंबापासून ते संपूर्ण बॉलिवूडमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

मुंबई,30 ऑक्टोबर- बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेता शाहरुख खानचा  (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान(Aryan Khan Bail)  याला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्याने खान कुटुंबापासून ते संपूर्ण बॉलिवूडमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर शाहरुख खानचे चाहते आर्यनच्या सुटकेने आनंदी आहेत आणि त्याला पाहण्याच्या आशेने वांद्रे येथील शाहरुख खानच्या 'मन्नत'  (Mannat) या सीफेसिंग बंगल्याबाहेर जमले आहेत.

आर्यन खान नुकताच जामीनावर बाहेर आला आहे. पण चाहते काल रात्रीपासून आपल्या आवडत्या स्टारला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. त्याचवेळी आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचे संपूर्ण कुटुंब आनंदात असून त्यांनी आर्यनच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. आर्यनच्या आगमनाच्या आनंदात 'मन्नत' लाईटच्या माळांनी आणि दिव्यांनी सजवण्यात येत आहे. शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर उपस्थित असलेल्या एका चाहत्यानं सांगितलं की,लाईटच्या माळा आणि दिव्यांनी भरलेला टेम्पो मन्नतकडे गेला आणि संध्याकाळी काही लोक मन्नतच्या टेरेसवर लाईटच्या माळा लावताना दिसले होते.

संध्याकाळी उशिरा शाहरुखच्या 'मन्नत'च्या वरच्या भागावर लाईटचा झगमगाट दिसून येत होता. शाहरुख खानचे चाहते आणि समर्थक गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या बंगल्याबाहेर उभे आहेत. आणि आर्यनची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. शाहरुखच्या समर्थनार्थ देशभरातील लोक त्याच्या बंगल्याबाहेर उभे आहेत. शाहरुखच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

पोलिस दलही लोकांना शांतता राखण्याचं आवाहन करताना दिसलं. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमून दिलेल्या परिसरात बॅरिकेड्सही लावण्यात आले आहेत. मन्नत बंगल्याबाहेर गर्दी असल्याने पाण्याच्या बाटल्या, समोसे विकणारे फेरीवाले यांना मिळकत होत असल्याचं दिसून आलं आहे.

(हे वाचा:कोणत्याही क्षणी आर्थर रोड तुरुंगाबाहेर येईल आर्यन खान)

ETimes च्या रिपोर्टनुसार, मन्नतच्या बाहेर उपस्थित असलेले लोक शाहरुखचे समर्थन करणारे बॅनर घेऊन उभे होते. त्यांच्यापैकी एक म्हणाला, “मी आणि माझे मित्र इथे येऊन आज २६ दिवस झाले आहेत. आम्ही शाहरुख खानचे प्रचंड चाहते आहोत. मी वांद्रे पूर्व येथे लहानाचा मोठा झालो. आणि मला या जागेशी एक विशेष बंध वाटतो."

First published:

Tags: Aryan khan, Entertainment, Shahrukh khan