मुंबई, 13 एप्रिल- सध्या शाहरूख खानची मुलगी सुहाना खान चांगलीच चर्चेत आहे. नुकतचं सुहाना खानला एका आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडची अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नसले तरी ती नेहमीच चर्चेत असते. सुहाना खान ही एकटीच नाही जिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच इतकी लोकप्रियता मिळवली आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टारकीड्स आहेत, ज्यांनी फिल्मी जगतात अद्याप पाऊल ठेवलेलं नाही तरी सोशल मीडियावर यांची चांगलीच हवा पाहायला मिळते. सोशल मीडियावर यांचा तगडा चाहता वर्ग आहे. अशाच एका स्टारकिडचा लहानपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्री जया बच्चन यांच्या मांडीवर एक गोंडस चिमुकला बसलेला दिसत आहे. हा मुलगा जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका चित्रपटातही झळकला आहे. चला तर जाणून घेऊया या स्टारकिडबद्दल.. वाचा- बॉलिवूडची ‘ही’ टॉपची अभिनेत्री बंद खोलीत स्वत:लाच करून घ्यायची अशी शिक्षा सुहाना खानसोबत आहे खास कनेक्शन तुम्हाला जर फोटो पाहून लक्षात आलं नसेल तर एक हिंट देतो. या स्टारकिड्सचा सुहाना खान आणि शाहरूख खान यांच्याशी खास संबंध आहे.या स्टारकिडने अद्याप चित्रपटांमध्ये काम केलेले नसले तरी तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. हा स्टारकिड दुसरा तिसरा कोणी नसून शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खान आहे.
आर्यन खानला व्हायचं आहे दिग्दर्शक शाहरुख खान आणि काजोल यांच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात आर्यन खानने किंग खानची बालपणीची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी देखील शाहरूख खानच्या आई वडिलांची भूमिका साकारली होती. हा फोटो कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचा आहे.
या फोटोमध्ये आर्यन खान अतिशय निरागस आणि गोंडस दिसत आहे. आर्यन खानची बहीण सुहाना खान लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तर आर्यन खानला अभिनेता व्हायचं नसून दिग्दर्शक व्हायचं आहे. लवकरच तो दिग्दर्शक म्हणून चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणार आहे. आर्यन खान सोशल मीडीयावर देखील प्रचंड सक्रीय असतो.