मुंबई, 25 एप्रिल : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कायमच चर्चेत असतो. कधी तो त्याच्या वागण्यामुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल होतो तर कधी वाहवा मिळवतो. आता सुहाना पाठोपाठ आर्यन देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. पण तो अभिनेता नाही तर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आर्यन त्याच्या पहिल्या चित्रपटात इतर कोणीही नाही तर त्याचे वडील शाहरुख खानलाच दिग्दर्शित करणार आहे. नुकतीच त्याची एक झलक समोर आली आहे. आर्यन खानने पोस्ट केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. शाहरुख खानचा वारसा वेगळ्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी त्याचा लाडका आर्यन खान पुढे सरसावला आहे. खरंतर आर्यनने त्याची पहिली अॅड फिल्म शूट केली आहे आणि याद्वारे त्याने दिग्दर्शनाच्या जगात पहिल्यांदाच हात आजमावला आहे. गंमत म्हणजे या व्हिडीओमध्ये शाहरुख खानची झलक दिसत आहे. त्याचा हा लूक खूपच डॅशिंग दिसत आहे.
काही महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये आर्यन खान आणि त्याचे मित्र बंटी आणि लेट्टी यांनी चाहत्यांना त्यांच्या लक्झरी स्ट्रीटवेअर ब्रँडबद्दल इशारा देत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या छोट्या व्हिडिओमध्ये शाहरुख खानची झलक पाहता येऊ शकते, आर्यनची ही जाहिरात येत्या 24 तासात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आर्यनसाठी हा खरोखरच आनंदाचा क्षण आहे कारण त्याला त्याच्या पहिल्या दिग्दर्शनाच्या प्रोजेक्टमध्ये त्याला त्याचे वडील शाहरुखला दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सध्या शाहरुखचा लेक प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे. Shah Rukh Khan: ‘मन्नत’ वर आलेल्या मॉडेलला शाहरुखने दिली अशी वागणूक; तिने पोस्ट शेअर करत सांगितला अनुभव या व्हिडिओ क्लिपवर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. सुहाना खाननेही तिच्या भावाच्या या कामावर कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. तसेच चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. ही व्हिडीओ क्लिप शेअर करताना सांगण्यात आले आहे की, हा संपूर्ण व्हिडिओ २४ तासांनंतर रिलीज केला जाईल आणि आता रिलीज होण्यासाठी काही तास बाकी आहेत.
शाहरुखचे दोन्ही मुलं सध्या ग्लॅमरच्या जगात नाव कमावत आहेत. त्याची मुलगी सुहाना खान झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटातून सुहाना खानसोबत अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तसेच ती अनेक मोठमोठ्या ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. तर दुसरीकडे शाहरुख येणाऱ्या काळात डंकी आणि जवान या सिनेमात झळकणार आहे. हे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.