• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • आर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; शाहरुख खानच्या कडक नियमाचं 'हे' आहे कारण

आर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; शाहरुख खानच्या कडक नियमाचं 'हे' आहे कारण

बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) चित्रपटाच्या पडद्यावरील रोमान्सचा राजा म्हणून प्रसिद्ध असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात तो मुली आणि महिलांचा खूप आदर करतो.

 • Share this:
  मुंबई, 14 मे : बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) चित्रपटाच्या पडद्यावरील रोमान्सचा राजा म्हणून प्रसिद्ध असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात तो मुली आणि महिलांचा खूप आदर करतो. त्यामुळं चित्रपटाच्या पडद्यावर अनेकदा शर्ट काढून आपल्या पिळदार शरीरयष्टीचं प्रदर्शन करणाऱ्या शाहरुखला आपल्या घरात पुरुषांनी शर्ट न (Shirtless) घालता फिरणं मान्य नाही. शाहरुखनं आपला मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यालाही या बाबतीत सक्त ताकीद दिली आहे. घरात शर्ट न घालता उघडं फिरायचं नाही. अंगात कायम शर्ट असला पाहिजे असा शाहरुखचा नियम आहे. ऐकून थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. शाहरुखनेच 2017 मध्ये फेमिना (Femina) मासिकाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. ‘आपल्या घरात एखाद्या पुरुषाला आई, बहीण किंवा मैत्रिणीसमोर शर्ट न घालता जाण्याचा अधिकार नाही,’ असं मला वाटतं. त्यामुळं मी नेहमीच आर्यनला घरात वावरताना टी-शर्ट घालायला सांगतो.’ ‘तुमची आई, मुलगी, बहीण किंवा मैत्रीण यांना कपड्यांशिवाय पाहून तुम्हाला अजब वाटत असेल तर तुम्हाला त्यांनी उघड्या अवतारात स्वीकारावं अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता? मुलगी करू शकत नाही असे काहीही करू नका,’ असंही त्यानं म्हटलं होतं. शाहरुख खान फॅमिली मॅन म्हणूनही प्रसिद्ध आहे. गौरीबरोबर प्रदीर्घ काळ डेटिंग केल्यानंतर शाहरुख खाननं 1991मध्ये तिच्याशी लग्न केलं. त्यांना आर्यन खान, अब्राम खान आणि सुहाना खान अशी तीन अपत्यं आहेत. आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवायला त्याला आवडतं. हे ही वाचा-मिलिंद सोमणनं मारले 6 बोटांवर पुलअप्स; पाहा अभिनेत्याचा थक्क करणारा वर्कआउट आर्यन खान सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय असून, त्याचे अनेक शर्ट लेस फोटो सोशल मीडियावर झळकत असतात; पण ते सगळे घराबाहेरचे असतात. लवकरच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. या वर्षी मार्च महिन्यात एका ट्विटरवरील (Twitter) प्रश्नोत्तरांच्या सत्रात युजर्सच्या प्रश्नांची उत्तरे देताना शाहरुख खाननं म्हटलं होतं की, ‘तुम्हाला एखाद्या स्त्रीच्या हृदयात स्थान मिळवायचे असेल तर तिला जास्तीत जास्त आदर द्या.’ एका युजरनं त्याला मुलगी पटवण्यासाठीच्या टिप्स देण्यास सांगितलं तेव्हा, अशा शब्दांचा वापर करणं टाळलं पाहिजे, असं सांगून शाहरुख खाननं त्या युजरला फटकारलं होतं. ‘सर्वात आधी असे शब्द वापरणं बंद करा आणि मुलींशी आदरानं, सभ्यतेने बोलण्याचा प्रयत्न करा,’ असं त्यानं म्हटलं होतं. सध्या शाहरुख खान ‘पठाण’ या चित्रपटात काम करत असून, त्याच्यासोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. पुढील वर्षी चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
  First published: