मुंबई, 2 जुलै: हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूडमध्ये (Bollywood art director) 25 वर्षांपासून अधिक काळ काम केलेले, मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) प्राप्त करणारे ज्येष्ठ कला दिग्दर्शक लीलाधर सावंत (Leeladhar Sawant in finantial crisis) यांची आर्थिक परिस्थिती (Financial Crisis) सध्या अत्यंत हलाखीची झाली आहे. औषधोपचारासाठीदेखील त्यांच्याकडं पैसा उरलेला नाही. त्यामुळं नाईलाजानं त्यांच्या पत्नी पुष्पा सावंत (Pushpa Sawant) यांनी चित्रपटसृष्टीला, कलाकारांना मदतीचं (appeal for Help) आवाहन केलं आहे. लीलाधर सावंत गेल्या दहा वर्षांपासून वाशीम जिल्ह्यातील जौलुका गावात रहात असून, त्यांच्या प्रदीर्घ आजारपणात त्यांच्याकडची सर्व पुंजी संपली आहे. सावंत यांना दोन वेळा ब्रेन हॅमरेज झालं असून, त्यांच्यावर दोन वेळा बायपास शस्त्रक्रियाही झाली आहे. आता त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी, औषधपाण्यासाठी तसंच उदरनिर्वाहासाठीदेखील त्यांच्याकडे काहीही शिल्लक नाही. लीलाधर सावंत यांनी कलादिग्दर्शक म्हणून तब्बल 177 चित्रपटांसाठी काम केलं आहे. यामध्ये सागर, हत्या, 110 डेज, दीवाना, हद कर दी आपने अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या याच योगदानासाठी त्यांना सर्वोच्च मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यावरूनच त्यांच्या कामाची महती लक्षात येते. कलेचं माहेरघर संकटात; जयप्रभा-शालिनी स्टुडीओच्या बचावासाठी आंदोलन हत्या (Hatya) या अभिनेता गोविंदाच्या (Govinda) अतिशय गाजलेल्या चित्रपटात त्याला मुख्य भूमिकेत घेण्याची सूचना सावंत यांनीच दिग्दर्शक कीर्ति कुमार यांच्याकडं केली होती, अशी माहिती सावंत यांच्या पत्नी पुष्पा सावंत यांनी दिली. या जोडप्याच्या मुलाचा लग्नानंतर काही काळातच कर्करोगानं मृत्यू झाला असून, त्यांना एक विवाहित मुलगी आहे. त्यामुळं त्यांची जबाबदारी घेणारं कोणीच नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्यानं शेवटी त्यांना मदतीसाठी हात पसरावे लागले आहेत. लीलाधर सावंत ज्यांना माहित आहेत, त्यांच्यावर ज्यांचं प्रेम आहे अशा लोकांनी पुढं यावं, त्यांच्याबरोबर काम केलेल्या कलाकारांनी आम्हाला मदत करावी, असं आवाहन पुष्पा सावंत यांनी केलं आहे. लग्नानंतर यामी गौतमला EDचा दणका; आर्थिक गैरव्यहार प्रकरणी पाठवलं समन्स एकेकाळी आपल्या कामानं चित्रपटसृष्टी गाजवलेल्या, दादासाहेब फाळके पुरस्कारासारखा सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या या कलाकाराची ही विपन्नावस्था काळजाला घरं पाडणारी आहे. पडद्यावर दिसणाऱ्या सुंदर चित्रामागे लीलाधर सावंत यांच्यासारख्या पडद्याआडच्या अनेक कलाकारांची मेहनत असते; पण काळाच्या ओघात ही माणसे मागं पडतात आणि जगही त्यांना विसरून जाते. अशाच काही दुर्दैवी लोकांपैकी लीलाधर सावंत हे एक आहेत. माध्यमांतून अनेकांपर्यंत त्यांची ही दयनीय परिस्थिती पोहोचल्यानं आता त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढं येतील अशी अपेक्षा आहे. ज्या चित्रपटसृष्टीत त्यांनी इतकं मोलाचं योगदान दिलं, अनेकांचे आयुष्य घडवलं ती चित्रपटसृष्टी त्यांच्या हाकेला साद देईल अशी आशा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.