मुंबई 19 ऑगस्ट: बिग बॉसमधून (Bigg Boss) नावारुपास आलेली अर्शी खान (Arshi Khan) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती अफगाणिस्तान प्रकरणामुळे चर्चेत आहे. अर्शी ही मुळची अफगाणिस्तानची आहे. (afghanistan crisis) त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल करत तू आपल्या देशात परत जा अशी टीका तिच्यावर केली. या ट्रोलर्सला आता अर्शीनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला असला तरी देखील मी भारतीयच आहे असं ती म्हणाली.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्शीनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिने ती भारतीय असल्याचं म्हणाली, “माझ्या नागरिकत्वावर सावाल उपस्थित करत आजवर मला अनेकांनी ट्रोल केलंय. हे खूपच कठीण होतं. अनेकांना मी पाकिस्तानी नागरिक असून भारतात राहत असल्याचा गैरसमज झालाय. याचा माझ्या कामावरीही परिणाम झाला. त्यामुळे मला हे एकदा स्पष्ट करायचंय की मी पूर्णपणे भारतीय आहे. माझ्याकडे भारत सरकारने मान्यता दिलेली सर्व ओळखपत्रं आहेत. मी पाकिस्तानची नसून भारतीय आहे.”
नऊवारी साडी अन् नाकात नथ... आर्या ठरतेय चाहत्यांची Crush! या लुकमुळे आणखी खुललं गायिकेचं सौंदर्य
अफगाणिस्तानमध्ये परतलं तालिबान राज
अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान राजवट परतली आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबूल ताब्यात घेतली आहे. तसंच तेथील अध्यक्षांच्या घरावरही त्यांचा झेंडा फडकावला आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी राजीनामा देत देश सोडला आहे. अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हजारो नागरिक सध्या मिळेल त्या मार्गानं देश सोडत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arshi khan, Big boss