Home /News /entertainment /

‘हा सोफा गुंडाळून का आलीस?’; अर्शीचे कपडे पाहून सलमाननं उडवली खिल्ली

‘हा सोफा गुंडाळून का आलीस?’; अर्शीचे कपडे पाहून सलमाननं उडवली खिल्ली

बिग बॉसमध्येच नव्हे तर त्यांच्या सक्सेस पार्टीमध्ये देखील जाणं हा कलाकारांसाठी एक प्रतिष्ठेचा विषय आता ठरु लागला आहे. परंतु या लोकप्रिय कलाकारांच्या पार्टीत अभिनेत्री अर्शी खाननं (Arshi Khan) मात्र स्वत:ची फजेती करुन घेतली. तिने परिधान केलेले कपडे पाहून अगदी सलमान खानला देखील हसू आवरलं नाही.

पुढे वाचा ...
  मुंबई 26 फेब्रुवारी : बिग बॉस (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. देशभरातील अनेक नामांकित सेलिब्रिटी या शोमध्ये झळकताना दिसतात. अनेक नव्या कलाकारांना या शोनं रातोरात अमाप प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्यामुळे बिग बॉसमध्येच नव्हे तर त्यांच्या सक्सेस पार्टीमध्ये देखील जाणं हा कलाकारांसाठी एक प्रतिष्ठेचा विषय आता ठरु लागला आहे. परंतु या लोकप्रिय कलाकारांच्या पार्टीत अभिनेत्री अर्शी खाननं (Arshi Khan) मात्र स्वत:ची फजेती करुन घेतली. तिने परिधान केलेले कपडे पाहून अगदी सलमान खानला देखील हसू आवरलं नाही. नुकताच बिग बॉसचा १४ वा सीझन (Bigg Boss 14) पार पडला. अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) हिनं यंदाच्या सीझनवर आपलं नाव कोरलं. रुबिनाचं कौतुक करण्यासाठी बिग बॉसनं आयोजित केलेल्या या खास पार्टीत अर्शीला देखील आमंत्रण मिळालं होतं. मात्र या पार्टीत ती चित्रविचित्र कपडे घालून आली. हे तू काय घातलं आहेस. बिग बॉसमधील सोफा तर अंगावर गुंडाळून तर आली नाहीस ना? असं म्हणत सलमाननं देखील तिची खिल्ली उडवली. अर्शीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
  अवश्य पाहा - सुहानाचा हा फोटो पाहून नेटकरी झाले सैराट; काही तासांत 11 लाख लोकांनी केलं लाईक अर्शी खाननं हे कपडे घालताना जगप्रसिद्ध पॉपस्टार लेडी गागाला कॉपी केलं अशी टीका काही नेटकरी करत आहेत. MTV Video Music Awards 2020मध्ये लेडी गागा अशाच प्रकारचे कपडे घालून आली होती. त्यावेळी तिची देखील नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती. अन् आता या विचित्र कपड्यांमुळं अर्शी खान ट्रोल होत आहे. अर्शी बिग बॉसच्या 11 व्या सीझनमध्ये झळकली होती. याशोमध्ये तिला दिर्घकाळ टीकता आलं नाही परंतु आपल्या मादक अदांनी तिनं प्रचंड प्रसिद्धी मिळवली. याच प्रसिद्धीमुळं तिला 14 व्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळाली होती. परंतु राखी सावंतच्या जलव्यासमोर तिची मादक अदा काहीसी फिकी पडली.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Arshi khan, Bigg boss, Bollywood, Entertainment, Rubina dillak, Salman khan

  पुढील बातम्या