मुंबई, 28 नोव्हेंबर: बॉलिवूड कलाकार नेहमीच चर्चेत असलेले पहायला मिळतात. बॉलिवूड कलाकारांसोबत त्यांचे कुटुंबीयही अनेकवेळा चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर चर्चेत आलीये. अंशुला तिच्या लव्ह लाईफमुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर तिच्या आयुष्यात आलेल्या प्रेमामुळे चर्चेत आहे. अंशुला गेल्या काही दिवसांपासून एक मुलासोबत फोटो शेअर करत असलेली पहायला मिळत आहे. हा मुलगा तिचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. अंशुला कपूर लेखक रोहन ठक्करला डेट करत असल्याचं समोर आलंय. अंशुलाने त्याच्यासोबत एक व्हिडीओ शेअर केल्यापासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलंय. हेही वाचा - ‘लहानपणीही बॅग्राउंडला आणि आत्ताही…’; अभिनेत्याने सांगितली आयुष्यातील ‘ती’ गोष्ट रोहनने हिंदी सिनेसृष्टीत काम केलं नाही मात्र त्याने इतर भाषांमध्ये काही प्रोजेक्ट केले आहेत. हिंदुस्थान टाईम्सनुसार, अंशुला आणि रोहन खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत. यंदाच्या वर्षीच दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. अंशुलाच्या कुटुंबालाही रोहनविषयी माहित असून त्यांना तो पसंत आहे. नुकतेच दोघेही व्हॅकेशनवर गेले होते. दोघांनी गोव्याला सोबत वेळ घालवला. अंशुलानेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर याचे फोटो शेअर केले आहेत.
अंशुलाला याविषयी विचारलं असता ती म्हणाली, ‘मला यावर काहीही बोलायचे नाही. मी मीडियासमोर याबद्दल बोलण्यास नकार देत आहे. मात्र मी याविषयी नकारही देत नाही आणि पुष्टीही करत नाही. माझ्या इच्छेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.’
दरम्यान, अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने अलीकडेच तिच्या वजन कमी करतानाचा एक फोटो शेअर केला होता. अंशुला कपूरने पूर्वीपेक्षा जास्त वजन कमी केल्याचे या फोटोत स्पष्टपणे दिसून आलं. अंशुलाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क झाले. अंशुलानं बऱ्यापैकी वजन कमी केलं. अंशुला तिची फिटनेस दिनचर्या किंवा वर्कआउट सर्वांसोबत शेअर करत नाही पण तिचे बदल तिच्या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येतात.