जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Arijit Singh: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये महिलेने अरिजित सिंगसोबत केलं धक्कादायक कृत्य; गायक जखमी

Arijit Singh: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये महिलेने अरिजित सिंगसोबत केलं धक्कादायक कृत्य; गायक जखमी

Arijit Singh: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये महिलेने अरिजित सिंगसोबत केलं धक्कादायक कृत्य; गायक जखमी

Arijit Singh Live Concert News: बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंगबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच अरिजित सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असं काही घडलं की गायक जखमी झाला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,9  मे- बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंगबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच अरिजित सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असं काही घडलं की गायक जखमी झाला आहे. अरिजित सिंग चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरिजित सिंगची एक महिला चाहती असं काही करुन बसली की गायकाच्या हाताला दुखापत झाली आहे. अरिजित सिंगचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याला प्रत्यक्षात ऐकण्यासाठी चाहते वाटेल त्या थराला जायला तयार असतात. या सर्व प्रकारचा कधी कधी अरिजित सिंगला त्रासदेखील सहन करावा लागतो. असाच एक अनुभव पुन्हा एकदा अरिजित सिंगला आला आहे. गायकाच्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका महिला चाहतीने अरिजित सिंगचा हात इतक्या जोरात ओढला की अरिजितला दुखापत झाली आहे. (हे वाचा: Chandrika Saha: धक्कादायक! अभिनेत्रीच्या पतीने स्वतःच्या च मुलाला केली मारहाण;जखमी अवस्थेत आहे 15 महिन्यांचा चिमुकला ) औरंगाबादमध्ये प्रसिद्ध गायक अरिजित सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अरिजित सिंग आपली लोकप्रिय गाणी सादर करत होता. शिवाय तो आपल्या उपस्थित चाहत्यांशी संवाद साधत होता. मात्र प्रेक्षकांशी संवाद साधत असताना एका चाहतीने अरिजितचा हात इतक्या जोरात खेचला की त्याला दुखापत झाली आहे. ही घटना घडली जेव्हा एका उत्साही चाहतीने अरिजितचा हात पकडण्याचा प्रयत्न केला आणि जोरात त्याचाउजवा हात खेचला ज्यामुळे त्याचा तोल गेला आणि त्याला दुखापत झाली. या घटनेचा एक लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अरिजित स्वतः या घटनेचा निषेध करताना दिसून येत आहे.

जाहिरात

महत्वाचं म्हणजे, व्हिडिओमध्ये अरिजित सिंग जखमी झाल्यानंतरही गाताना दिसत आहे. यावेळी अरिजितने त्या चाहतीला शांत राहून कलाकारांचा आदर करण्याचा सल्ला दिला. गायकावर स्टेजवरच प्राथमिक उपचार करण्यात आले. अरिजितला आपल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये जास्त व्यत्यय आणायचा नव्हता त्यामुळे त्याने प्राथमिक उपचार घेत आपलं गाणं सुरु ठेवलं. या व्हिडीओमध्ये अरिजित त्या चाहतीला सांगताना दिसतो, “तू माझा हात वाईटरित्या खेचत होतीस… बघ, माझा हात अजून थरथरत आहे. मला वेदना होत आहेत… मी माझा हात हलवू शकत नाही." यानंतर,त्या चाहतीने वारंवार अरिजितची माफीसुद्धा मागितली.

News18लोकमत
News18लोकमत

अरिजित सिंगने आपल्या इतर चाहत्यांना निराश न करता लाईव्ह कॉन्सर्ट सुरळीत सुरु ठेवला. या व्हिडीओमध्ये अरिजित सिंगचा संयम पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. अरिजितच्या जागी इतर कुणी असतं तर हे मुळीच खपवून घेतलं नसतं आणि कॉन्सर्ट मध्येच थांबवलं असतं अशी चर्चा चाहते करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात