ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर त्यांचा ६३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंब या सोहळ्याला उपस्थित होतं. त्यात विशेष लक्ष वेधलं ते आलिया आणि भट्ट कुटुंबियांनी पाहा फोटो.
संपूर्ण कपूर आणि भट्ट बहिणी एकाच फोटोत पाहायला मिळत आहे. करीना, करिश्मा तसेच आलिया आणि तिची मोठी बहीण शाहीन भट्ट ही नीतू यांच्या वाढदिवसाला उपस्थित होत्या.
कपूर आणि भट्ट कटुंबाची ही उपस्थिती अनेकांसाठी भुवया उंचावणारी होती. कारण रणबीर आणि आलिया एकमेकांशी ऑफिशियली एन्गेज होणार असल्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच नीतू यांनी आलिया , रणबीर आणि रिद्धीमासोबत फोटो शेअर करत 'माझ विश्वं' असं कॅप्शन दिलं होतं.