मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अनुष्का शर्मानं मुलगी वामिकासोबत सायकल चालवतानाचा व्हिडीओ केला शेअर

अनुष्का शर्मानं मुलगी वामिकासोबत सायकल चालवतानाचा व्हिडीओ केला शेअर

  • Published by:  Sayali Zarad

मुंबई. 19 जून : नेहमीच चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma)आणि क्रिकेटपटू विराट कोहली(Virat Kohli). दोघांनाही पाॅवर कपल म्हणून ओळखलं जातं. अनुष्का तिच्या इन्स्टाग्रामवर जास्त सक्रीय असते. मात्र तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या क्षणांची ती चाहत्यांना माहिती देत असते. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना जानेवारी 2021 मध्ये मुलगी झाली. मुलीचं नाव वामिका (Vamika)असं ठेवण्यात आलं. अनुष्का मुलीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते मात्र यामध्ये ती तिचं तोंड दाखवत नाही. अशातच अनुष्कानं वामिका सोबतचा (Virushka daughter) आणखी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

विराट आणि अनुष्का दोघेही त्यांची मुलगी वामिकासह सुट्टीसाठी मालदीवला गेले होते जिथे त्यांनी तिथे खूप मजा केली. आता या आनंदी घालवलेल्या श्रणांना अनुष्का मिस करत आहे. त्यामुळे तिनं मालदिवमधला व्हिडीओ शेअर केला आहे. अनुष्काने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मालदीवमध्ये सायकल चालवताना दिसत आहे तर वामिका सायकलवर तिच्या मागे बसलेली आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्काने अनेक वेगवेगळे व्हिडिओ एकत्र करून एक व्हिडिओ बनवला आहे. ज्यामध्ये अनेक सुंदर ठिकाणे टिपण्यात आली आहेत. यामध्ये अनुष्का ऑरेंज कलरचा स्विमसूट आणि टोपी परिधान करताना दिसत आहे. ती वामिकासह सुंदर ठिकाणी फिरत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत अनुष्काने लिहिले, 'माझ्या दोन प्रिय लोकांसोबतच्या सर्वोत्तम आठवणी. मला परत घेऊन चला.' अनुष्कानं शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. दोघांनीही आपली मुलगी वामिकाला लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या मुलीसोबतचे फोटो पोस्ट करत असले तरी, ते आपल्या इंस्टाग्राम कुटुंबासमोर तिचा चेहरा येऊ देत नाहीत. वामिकाच्या जन्मापासून, या जोडप्याने मीडियाला विनंती केली की जेव्हाही ती शहरात दिसली तेव्हा तिचे फोटो क्लिक करू नका.

हे ही वाचा -  Father's Day 2022: निक जोनस ते गुरमीत चौधरी हे 8 सेलिब्रेटी पहिल्यांदाच साजरा करणार 'फादर्स डे'

जानेवारी 2022 मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान एका ब्रॉडकास्टरने चुकून वामिकाचा चेहरा उघड केला होता. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये वामिका तिची आई अनुष्कासोबत विराटला चिअर करताना दिसत आहे. दोघेही स्टँडवर उभे होते आणि वामिका क्रिकेटपटूंसाठी टाळ्या वाजवत होती. हा क्लिक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मात्र, त्यानंतर या जोडप्याने मुलीचा फोटो प्रसिद्ध न करण्याचे आवाहन सर्वांना केले.

First published:

Tags: Anushka sharma, Virat anushka, Virat kohli