मुंबई, 06 मार्च: भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली (Virat Kohli) आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानात विराट आक्रमक असतो, हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला विराट कोहली मैदानात खूपच आक्रमक असायचा. त्यामुळे त्याला अनेकदा टीकेचा धनीनी व्हावं लागलं आहे. पण कालांतराने त्याचा आक्रमकपणा काहीसा कमी झालेला दिसतो. पण वास्तविक जीवनात विराट खूपच शांत असल्याची माहिती बॉलीवूड अभिनेत्री आणि पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) दिली आहे.
आपल्या फलंदाजीने करोडो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या विराटने आपल्या आयुष्यात आणि स्वभावात झालेल्या बदलाचं पूर्ण श्रेय पत्नी अनुष्का शर्माला देतो. त्याने अनेकदा ही बाब बोलूनही दाखवली आहे. सध्याच्या घडीला विराट आणि अनुष्का ही जोडी देशातील सर्वात स्टार जोडी मानली जाते. ते दोघंही एकमेकांचं कौतुक करताना थकत नाहीत. अलीकडेच त्यांच्या घरात छोट्या परीने जन्म घेतल्याने ते पहिलांदा आई-बाबाही झाले आहेत. एका मुलाखतीत अनुष्कानं म्हटलं होतं की, विराट मैदानावर जितका आक्रमक आहे, तितकाच तो मैदानाबाहेर शांत आहे.
2019 सालच्या फिल्मफेअर कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना अनुष्काने पती विराट कोहलीविषयी अनेक बाबी उघडपणे सांगितल्या होत्या. विराट कोहली त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण अनुष्काला असा विश्वास आहे की, तो केवळ मैदानावरच आक्रमक असतो. कारण विराटचं क्रिकेटवर खूपचं जास्त प्रेम आहे. अनुष्काने आपल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘मैदानाबाहेर विराट खूपच शांत असतो. आपण हे माझ्या मित्रांना आणि टीमला विचारू शकता. मी अनकेदा विराटला म्हणते असते, 'यु आर सो चिल.'
हे ही वाचा- अनुष्का शर्मासमोरच जेव्हा विराट कोहली मरण्याचा अभिनय करतो...
यावर्षी जानेवारीत मुलगी वामिकाचा जन्म झाला आहे. यासाठी विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुट्टीही घेतली होती. दोघंही आपल्या कामाप्रति खूप गंभीर आहेत, त्यामुळे ते सतत व्यग्र राहतात. असं असूनही, त्यांच्या नात्यातील मजबुती कायम ठेवण्यासाठी, विराट आणि अनुष्का आपले व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यात चांगल्याप्रकारे समतोल राखतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Virat kohli