जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बाईक राइड करताना नियम मोडले, बीग बींना लिफ्ट देणाऱ्याला हजार तर अनुष्काच्या बॉडीगार्डला साडे दहा हजार दंड

बाईक राइड करताना नियम मोडले, बीग बींना लिफ्ट देणाऱ्याला हजार तर अनुष्काच्या बॉडीगार्डला साडे दहा हजार दंड

अमिताभ बच्चन-अनुष्का शर्माला लिफ्ट देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई

अमिताभ बच्चन-अनुष्का शर्माला लिफ्ट देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई

Amitabh Bchchan-Anushka Sharma Bike Ride: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांना लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वारांना मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलान जारी केलं आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 मे- बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांना लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वारांना मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलान जारी केलं आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी लिफ्ट घेत असल्याच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.दरम्यान नेटकऱ्यांनी त्वरीत निदर्शनास आणून दिलं की चालक किंवा मागे बसणाऱ्या सेलिब्रेटी दोघांनीही हेल्मेट घातलेलं नव्हतं. या व्हिडीओवर आलेल्या प्रतिक्रियाना उत्तर देताना मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलने त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं नमूद केलं होतं. त्यांनी म्हटलेलं “आम्ही हे वाहतूक शाखेशी शेअर केलं आहे,”. यानंतर आता मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलान पाठवून दोन्ही दुचालकांना दंड ठोठावला आहे. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून छायाचित्रांची पडताळणी करण्यात आली आहे. (हे वाचा: कोण आहे अमिताभ यांची मेहुणी? जया बच्चनच्या बहिणीने अर्धवट सोडलेली UPSCची तयारी, आज जगतेय असं आयुष्य ) मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्माच्या बॉडीगार्ड आणि दुचाकी चालकाच्या बाबतीत सांगायचं तर, त्याच्याकडे वैध परवाना नव्हता कारण त्याच्या लर्निंग लायसन्सची मुदत 2020 मध्ये संपली होती. त्यामुळे त्याला 5000 रुपयांचा दंड आणि बाईकच्या मालकाला 5000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. याशिवाय, विना हेल्मेट चालवल्याबद्दल त्यांना 500रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.अर्थातच त्यांना एकूण साडे दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

जाहिरात

तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांना लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट नसल्यामुले हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, अमिताभ यांनी उघड केलं होतं की, कामासाठी उशीर झाल्याने ते एका अनोळखी व्यक्तीसोबत बाईकवर शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले. सुपरस्टारने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर कॅप्शनसह एक फोटो शेअर केला आहे, “राइडबद्दल धन्यवाद मित्रा..मी तुला पर्सनली ओळखत नाही.. परंतु तू तरी मला माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवलं.. जाम ट्राफिकमुळे होणार विलंब टळला’. नंतरच्या दिवसात, अनुष्का हेल्मेटशिवाय पिलियन सीटवर बसल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.कलम 129/194(डी), कलम 5/180 आणि कलम 3(1)181 एमव्ही कायदा अंतर्गत हे चलन जारी करण्यात आलं आहे. दोन्ही मालकांनी दंड भरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात