मुंबई, 17 मे- अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेला तोडच नाही असं अनेकजण म्हणतात. अमिताभ बच्च न यांना मेगास्टार,बिग बी, देशातील सर्वात मोठा सुपरस्टार, अँग्री यंग मॅन अशा अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं. आजही अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता जशीच्या तशी आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांचं खाजगी आयुष्यसुद्धा लोकांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांच्या नात्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल लोकांना माहिती आहे. परंतु अमिताभ यांच्या कुटुंबाबद्दल आणि त्यातील सर्वच सदस्याबाबत चाहत्यांना फारच कमी माहिती आहे.यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या मेहुणीचासुद्धा समावेश होतो. 70-80 दशकातील आघडीच्या नायिकांमध्ये जया भादुरी अर्थातच जया बच्चन यांचा समावेश होतो. जया बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्याकडे चित्रपट घेऊन येणाऱ्या निर्मात्यांची रांग लागत असे. असं म्हटलं जातं की, अमिताभ बच्चन यांचं करिअर वर आणण्यात जया बच्चन यांचा मोठा वाटा आहे. आपल्या करिअरच्या यशाच्या शिखरावर असताना जयांनी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं होतं अमिताभ बच्चन यांचं सासर भोपाळमध्ये आहेत. जया यांच्या आईचं नाव इंदिरा भादुरी आहे. तर वडील तरुण कुमार भादुरी हे त्यांच्या काळातील ज्येष्ठ पत्रकार होते. जया यांनी सिनेसृष्टीत करिअर करत प्रचंड लाइमलाइट मिळवली आहे. पण जया बच्चन यांची बहीण या लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहते. (हे वाचा: The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी पाहून ‘गोपी बहू’चं मोठं विधान; 5 महिन्यांपूर्वी केलंय मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न ) फारच कमी लोकांनां माहिती असेल की, जया भादुरी यांना तीन बहिणी आहेत. जया मोठी असून त्यांना नीता आणि रीटा वर्मा या दोन लहान बहिणी आहेत. जया फक्त 15 वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट ‘महानगर’ हा बंगाली चित्रपट होता. त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत संधी मिळाली. जया जितक्या लाइमलाइटमध्ये राहत होत्या तितक्याच त्यांच्या बहिणी लाइम लाईटपासून दूर राहणं पसंत करतात. अमिताभ बच्चन यांचे साडूसुद्धा चित्रपटसृष्टीशी निगडीत आहे. पण त्यानंतरही त्यांची बहीण रिटा हिला हे ग्लॅमर जग आवडत नाही. रीटाच्या पतीचे नाव राजीव वर्मा असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रीटा आणि राजीव यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिटा आणि राजीव थिएटर करत असताना भेटले होते. हा तो काळ होता जेव्हा दोघेही थिएटरमध्ये काम करायचे. याच काळात दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. तीन वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी 1976 मध्ये लग्न केलं होतं. मात्र, रिटा यांनी स्वत:ला फिल्म इंडस्ट्रीपासून दूर ठेवलं आहे. आणि आजही त्या भोपाळमध्ये राहतात.
रिटा अभ्यासात चांगली होती. त्यामुळे एमए केल्यानंतर तिने आयएएसची तयारी सुरु केली होती. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितलं होतं की, राजीव आर्किटेक्ट पदावर होते. लग्नाआधी एकदा त्यांनी मजेत मला म्हटलं होतं की, तू आयएएस होऊन माझी अधिकारी होशील. आणि हे ऐकून त्यांनी चक्क आयएएसची तयारी करणंच सोडून दिलं होतं. बऱ्याच दिवसांनंतर त्या सेंट्रल स्कूलमध्ये इंग्रजीच्या प्रोफेसर म्हणून रुजू झाल्या होत्या. इकडे राजीवही मुंबईला शिफ्ट झाले होते. मुंबईला येणं-जाणं असायचं पण नोकरी, मुलांचं शिक्षण आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते कधीच मुंबईत स्थायिक झाल्या नाहीत. पुढे त्यांनी शाळेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.