Home /News /entertainment /

Cannes 2022: कानमध्ये अनुराग ठाकूरना लॅव्हिश डिनर म्हणून काय काय मिळालं माहीत आहे का?

Cannes 2022: कानमध्ये अनुराग ठाकूरना लॅव्हिश डिनर म्हणून काय काय मिळालं माहीत आहे का?

कान्स या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल मध्ये भारताला Country of the Honour चा किताब मिळाला आहे. केंद्रीय मंत्री फ्रान्सला गेले असता अत्यंत चविष्ट जेवण देऊन त्यांचं आदरातिथ्य करण्यात आलं.

  मुंबई 18 मे- दरवर्षी होणारा कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Festival 2022) द अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या वर्षी कानमध्ये  भारताचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांचं जंगी स्वागत करण्यात आल्याचं दिसून आलं.  यंदाच्या महोत्सवाचं भारतीयांच्या दृष्टीने वैशिष्ट्य म्हणजे Cannes 2022 मध्ये इंडियन पॅव्हेलियन (Indian pavilion at cannes 2022) आहे. कान्स महोत्सवात भारताला 'Country Of The Honor' चा मान मिळाला आहे. कोणत्याही देशाला हा मान मिळण्याची पहिलीच वेळ आहे. यावर्षी अनेक भारतीय चित्रपट कान्समध्ये पाहायला मिळतील. 75 व्या कान्स फेस्टिव्हलच्या भारतीय पॅव्हेलियनचं उदघाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. अनुराग ठाकूर (Anurag Thakur at Cannes 2022) यांच्या जेवणाची सुद्धा खास व्यवस्था करण्यात आली होती. भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारं अत्यंत उत्तम पद्धतीचं जेवण त्यांना वाढण्यात आलं. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, 'प्याज की कचोरी', 'लाल मांस', 'गट्टे की सब्जी', 'कढी' आणि 'खिचडी' असं पारंपरिक भारतीय जेवण त्यांना देण्यात आलं होतं तर गोड पदार्थांमध्ये कलाकंद देण्यात आला होता.

  वाचा - Hruta Durgule चा ब्रायडल LOOK आहे फारच खास, पाहा मराठमोळ्या अभिनेत्रीचा Wedding Album

  अनुराग ठाकूर यांनी उदघाटन करताना सांगितलं, "भारतीय चित्रपटाला उडायचं आहे, झेप घ्यायची आहे पण थांबायचं नाहीये. नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत सुरु केलेल्या उपक्रमात विविध भाषांतील 2000 पेक्षा जास्त चित्रपटांचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे." अनुराग ठाकूर यांच्यासह संगीतकार ए. आर. रहमान, गीतकार प्रसून जोशी, अभिनेत्री दीपिका पदुकोण, तमन्ना भाटिया, अभिनेता आर. माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, दिग्दर्शक शेखर कपूर, गायक मामे खान यांनीही संवादात भाग घेतला.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Film festival

  पुढील बातम्या