जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Anupamaa: अनुपमामध्ये येणार सर्वात मोठा ट्विस्ट; होणार 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री?

Anupamaa: अनुपमामध्ये येणार सर्वात मोठा ट्विस्ट; होणार 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री?

अनुपमा

अनुपमा

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो ‘अनुपमा’ सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या शोने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. शोचा आगामी ट्विस्ट आणि टर्नदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑक्टोबर-   टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो ‘अनुपमा’ सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या शोने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. शोचा आगामी ट्विस्ट आणि टर्नदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दरम्यान शोमध्ये पुन्हा एकदा काहीतरी रंजक घडणार आहे. जे पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. दुसरीकडे, प्रेक्षक त्यांच्या आवडत्या स्टारला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यास उत्सुक असतील. टीव्ही जगतातील प्रेक्षकांची आवडती स्टार मराठमोळी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची अनुपमामध्ये एन्ट्री होणार आहे. या शोमध्ये त्या महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त समोर आलं आहे. जस्टशोबिजच्या एका रिपोर्टनुसार, ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या शोमध्ये शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर इतर अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, त्या अनुज कपाडियाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, अनुज कपाडियाच्या आईच्या भूमिकेच्या दाव्याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण अनुजच्या आई-वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे हे प्रेक्षकांना चांगलंच ठाऊक आहे. मात्र, ‘जस्टशोबिज’च्या रिपोर्टमध्ये सुप्रिया शिक्षिकेच्या भूमिकेत शोमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. **(हे वाचा:** Bigg Boss 16: गौतम-सौंदर्याच्या नात्याला करण जोहरने म्हटलं फेक; शालिनची घेतली शाळा ) शोचा एक प्री-कॅप व्हिडिओ नुकतंच कलर्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये असं दिसून आलं की अनुपमा आणि अनुज त्यांची पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि दोघांनाही ती अविस्मरणीय बनवायची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी अनुपमाला अनुज एक कॉलेज फॉर्म भेट देतो. आणि अनुपमाला तिची स्वप्ने जगायला सांगतो.मालिकेत येणारा हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांना अधिकच उत्सुक करत आहे. ‘आई कुठे काय करते’प्रमाणे आता अनुपमाच्या शिक्षणाचा ट्रॅक मालिकेत पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही. सध्या मालिकेत अनुजकडून ही खास भेट मिळाल्याने अनुपमाला प्रचंड आनंद झाला आहे. त्यानंतर व्हिडीओमध्ये अनुज अनुपमाला बाईकवर बसवून कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी जाताना दिसून येत आहे. मात्र, अरुंधतीप्रमाणे अनुपमाचा हा प्रवाससुद्धा सोपा नसणार आहे.अनुपमाला तिच्या निम्म्या वयाच्या विद्यार्थ्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागणार आहे. तरुण विद्यार्थ्यांसोबत कॉलेजमध्ये राहण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. अनुपमा या सर्व गोष्टींसाठी तयार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर जेव्हा सगळे तिच्या विरोधात उभे राहतील, तेव्हा अनुपमाचं आव्हान वाढणार आहे. तेव्हा एक खास लोक तिच्या अडचणी कमी करतील. मीडिया रिपोर्टनुसार, ती खास व्यक्ती दुसरी कोणी नसून नवीन एंट्री घेणाऱ्या सुप्रिया पिळगावकर असणार आहेत. म्हणूनच सुप्रिया पिळगांवकर अनुपमाच्या शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, अनुपमा आणि सुप्रियाच्या पात्रांमध्ये मजबूत संबंध निर्माण झालेले दिसणार आहेत. सुप्रिया यांचं पात्र मालिकेत अनुपमासाठी एक उत्तम मार्गदर्शक आणि खंबीर आधार बनणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात