• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'हे वर्ष कठीण आहे, सांभाळून राहा' स्मिता पाटील यांना अन्नू कपूरांनी केलं होतं सावध, त्याच वर्षी झाला मृत्यू

'हे वर्ष कठीण आहे, सांभाळून राहा' स्मिता पाटील यांना अन्नू कपूरांनी केलं होतं सावध, त्याच वर्षी झाला मृत्यू

वयाच्या अवघ्या 31 वर्षी स्मिता पाटील (Smita Patil) यांनी अखेरचा श्वास घेतला होता. पण अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांनी स्मिता यांना आधीच सावध केलं होतं. पाहा काय घडलं होतं.

 • Share this:
  मुंबई 9 सप्टेंबर : भारतीय सिनेसृष्टीतील एक अजरामर अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील (Smita Patil) यांचं नाव आजही घेतलं जातं. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मानवर जणू गारूड केलं होतं. अगदी कमी वयातच त्यांनी मोठं यश संपादन केलं होतं. एक अभिनेत्रीच नाही तर सामाजिक कार्यातही त्यांनी मोठं योगदान दिलं होतं. पण अगदी कमी वयातच या अष्टपैलू अभिनेत्रीचा अंत झाला. वयाच्या अवघ्या 31 वर्षी 1986 साली स्मिता पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला होता. पण अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांनी स्मिता यांना आधीच सावध केलं होतं. पाहा काय घडलं होतं. अन्नू कपूर यांनी स्मिता यांचा हात पाहून हे वर्ष कठीण असल्याचं सांगितलं होतं. सुहाना सफर विथ अन्नू कपूर या त्यांच्या लोकप्रिय रेडिओ शोमध्ये त्यांनी याचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितलं की, “22 जानेवारी 1986 ला मी स्वर्गीय स्मिता पाटील यांच्या एका प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं. सत्यजीत रे यांची एक मालिका यायची त्यात मी त्यांच्या पतीचं काम केलं होतं. आम्ही दोघांनी तीन दिवसांसाठी तिथे शुटींग केलं.”

  OMG! सोनमच्या घरी आहे तब्बल 18 लाखांचा सोफा; असं आहे लंडनचं आलिशान घर; पाहा Photos

  पुढे ते म्हणाले, “जेव्हा आम्ही कोलकत्यावरून मुंबईला परतत होतो तेव्हा, आम्ही बसलो होतो, त्यावेळी मला हस्तरेखा पाहण्याचा छंद होता. स्मिता मला म्हणाली, अनु तू बघना माझा हात. मी तिचा हात पाहिला अन् म्हटलं जीवनरेषेला कोणतीही भाग्यरेषा सपोर्ट नाही करत. जीवनरेषा पुढेही जात नाहीये.” पुढे त्यांनी स्मिता यांना सांगितल की, “स्मिता हे वर्ष कठीण आहे, सांभाळून राहा.” पण याच्या काहीच महिन्यांनंतर त्याच वर्षी 13 डिसेंबर 1986 ला स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला. मुलगा प्रतिक याच्या जन्मानंतर केवळ 15 दिवसांतच स्मिता यांचा मृत्यू झाला होता.
  Published by:News Digital
  First published: