मुंबई, 21 मार्च: अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande )लग्नानंतरचा पहिला सण म्हणजे होळी. हा सण तिने धुमधडाक्यात साजरा केला. त्यासंदर्भात अनेक व्हिडीओ फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या पहिल्या सणाची बी टाऊनमध्ये चर्चा रंगली असतानाच सध्या तिच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती पती विकी जैनवर भलतीच भडकली आहे. तिच्या अनेक चाहत्यांना त्यामागील काय कारण असेल हे जाणून घेण्याची उस्तुकता लागली आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची ही लग्नानंतरची पहिली होळी होती. यावेळी हे दोघेही होळीचा पुरेपूर आनंद लुटताना दिसले. तसेच, यावेळी या दोघांचा रोमॅन्टिक मूड कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी अंकिताने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती तर विकीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
अशातच, आणि विकीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात दोघेही गुलाबी रंगाने रंगलेले दिसत आहेत.अंकिता समोरून चालत येते आणि विकीवर रागावते. विकी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे. हा व्हीडिओ खूप व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ अंकिता लोखंडेच्या इंस्टाग्राम फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी बिचारा विकी गेला, काही मोठी चूक झाली आहे. त्याच वेळी, काही लोकांनी विचारले की दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे, नाही का अशा अनेक कमेंट्स त्यांच्या या व्हिडीओवर येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.