मुंबई, 13 डिसेंबर: बी टाउनमध्ये सध्या सनई चौघडेंचे सुर ऐकायला मिळत आहेत. लवकरच अंकिता लोखंडे (Ankita Lokhande )आपल्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजे विक्की जैनसोबत (Vicky Jain )सात फेरे घेणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून तिच्या लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आहे. 14 डिसेंबरला दोघे लग्नबेडीत अडकणार असून काल ते खऱ्या अर्थाने ‘एन्गेज्ड’(Ankita-Vicky Engagement) झाले. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रविवारी अंकिता आणि विक्कीचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. त्यांच्या या ग्रँड सोहळ्यात इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते. या सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
या सोहळ्यासाठी अंकिता आणि विक्की ग्रे कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. दोघेही खूप सुंदर दिसत होते. या फंक्शनमध्ये अंकिताने विकीसाठी परफॉर्म केले तसेच दोघांनी एकमेकांसाठी काही खास शब्दात भावनादेखील व्यक्त केल्या.
दरम्यान हा सोहळा रविवारी रात्री पार पडला असून त्याच दिवशी सकाळी मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटोही अंकिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. कुटुंबासह अंकिताच्या मित्रांनीही मेहंदी फंक्शनला हजेरी लावली होती. ज्यामध्ये सृष्टी रोडे, माही विज. अपर्णा दीक्षित, अमृता खानविलकर, विकास गुप्ता, दिगांगना यांच्यासह अनेक कलाकार होते.