मुंबई, 12 नोव्हेंबर- मराठमोळ्या अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) सध्या 'पवित्र रिश्ता २' मधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहेत. मात्र या दोघी ऑफस्क्रीनसुद्धा तितकीच धम्माल करत आहेत. सतत या दोघींचे सेटवरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल (Dance Video) होत असतात. नुकताच सोशल मीडियावर या दोघींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये या दोघी माधुरी दीक्षितच्या 'हमको आज कल है इंतजार' या गाण्यावर जबरस्त डान्स करत आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिंदी मालिकांमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर दुसरीकडे अभिज्ञा भावे मराठी मालिकांमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. या दोघींचा आपला एक चाहतावर्ग आहे. या दोघींना फारच पसंत केलं जातं. 'पवित्र रिश्ता २' या लोकप्रिय मालिकेच्या निमित्ताने या दोघीही एकत्र आल्या आहेत. यामध्ये अंकिता पहिल्या भागाप्रमाणे अर्चनाच्या भूमिकेत आहे. तर अभिज्ञा तिच्या वाहिनीच्या अर्थातच मंजुषाच्या भूमिकेत आहे. या दोन्ही मराठमोळ्या अभिनेत्री एकत्र येऊन ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन धम्माल करत आहेत. सतत अभिज्ञा आणि अंकिताचे डान्स व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात. ते मोठ्या प्रमाणात पसंतही केले जातात. यावरूनच त्या दोघींमध्ये फारच छान बॉण्डिंग झाल्याचं दिसून येतं.
नुकताच अभिज्ञा आणि अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघीही सेटवर दिसत आहेत. कारण अभिज्ञा आणि अंकिता मालिकेतीलच गेटअपमध्ये आहेत. अंकिताने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तर अभिज्ञा मरून रंगाच्या साडीमध्ये दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये दोघी माधुरी दीक्षितच्या गाजलेल्या 'हम को आज कल है इंतजार' या गाण्यावर डान्स करत आहेत. हे गाणं १९९० मध्ये आलेल्या 'सैलाब' या चित्रपटातील आहे. यामध्ये अभिनेता आदित्य पांचोली आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका होत्या. हे गाणं आजही फारच लोकप्रिय आहे. अनेक सर्वसामान्य लोक आणि कलाकार या गाण्यावर आजही तितक्याच आवडीने डान्स करतात. अभिज्ञा आणि अंकितालासुद्धा या गाण्यावर डान्स करण्याचा मोह नाही आवरला.
(हे वाचा:'डॉक्टर डॉन' दिसणार प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ सिनेमात )
या दोघींचा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.चाहत्यांकडून व्हिडिओला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स करून आपलं मत व्यक्त केलं आहे. चाहत्यांकडून दोघींचंही कौतुक होत आहे. अभिज्ञा आणि अंकिता दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सतत काही ना काही पोस्ट करून या दोघी चाहत्यांच्या संपर्कात असतात. कधी आपले फोटो तर कधी रिल्स तर कधी आपल्या पार्टनरसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करून या दोघी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ankita lokhande, Entertainment