कंगनावर संतापले मराठी कलाकार, सोशल मीडियावरून केला टीकेचा भडिमार

कंगनावर संतापले मराठी कलाकार, सोशल मीडियावरून केला टीकेचा भडिमार

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिनं देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिनं देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली आहे. बॉलिवूडसह मराठी कलाकारही कंगणावर चांगलेच संतापले आहेत. एवढं नाही तर आता कंगणावर सोशल मीडियावरून टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. 'कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका. #ILoveMumbai', अशा शब्दांत काही कलाकालांनी कंगनाला सुनावलं आहे.

हेही वाचा...'नार्को टेस्ट या क्षणी घ्या! बालिश आरोप करण्यापेक्षा कंगना काय सांगते ते तर ऐका'

कोण काय म्हणालं...?

मुंबईविरुद्ध वक्तव्य केल्यानंत संतप्त ट्वीट करत मराठी कलाकारांनी खडेबोल सुनावले आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं कंगनावर टीका करताना 'मुंबई मेरी जान!' असं म्हणतं #कर्मभूमी #ILoveMumbai #विषयसंपला हे हॅशटॅग वापरले आहेत. तर अभिनेता रितेश देशमुख यानं कंगनाला थेट प्रत्युत्तर दिलं नसलं तरी सूचक अशी टिप्पणी केली आहे. 'मुंबई हिंदुस्तान है' असं रितेश देशमुख यानं ट्वीट केलं आहे.

काय म्हणाल्या अभिनेत्री प्रिया बेर्डे?

ज्या मुंबईत स्वतःच करियर बनवलं त्या मुंबईलाच पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली?, असा संतप्त सवाल ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी कंगनाला केला आहे.

हेही वाचा...

ज्या शहराने नाव दिलं, ओळख दिली, मान दिला आणि जगण्याला अर्थ दिला त्या माझ्या मुंबई शहराचा मला अभिमान आहे. जे जे आले त्यांना सामावून घेण्याचा मोठेपणा दाखवाला आहे या शहराने. कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका. #ILoveMumbai, असं मराठी अभिनेता जितेंद्र जोशी यानं केलं आहे.

तर जिस थाली में खाना उसी मे छेद करना. आमच्या मराठीत पण अशीच एक म्हण आहे.....ज्या ताटात खातात त्यातच *****मुंबई आमचं प्रेम आहे. विषयच नाही !!!! असं म्हणत अभिनेत्री तेजाज्ञाने ट्विट केलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 4, 2020, 11:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading